'जमिनीचा मोबदला न मिळाल्याने महिला शेतकऱ्यांने दिला आत्मदहनाचा इशारा'

गेल्या पस्तीस वर्षापासुन उजनी कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला शेतकऱ्याने वारंवार मागणी करून ही दिला तर नाहीच ऊलट त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवली.
Sunita Waghmode
Sunita WaghmodeSakal
Updated on
Summary

गेल्या पस्तीस वर्षापासुन उजनी कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला शेतकऱ्याने वारंवार मागणी करून ही दिला तर नाहीच ऊलट त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवली.

मोहोळ - उपजिल्हाधिकारी तथा भुसंपादन क्रंमाक 7 यांचे कार्यालय सोलापूर, की जूना करमाळा-कुर्डुवाडी प्रांत कार्यालय यांच्या वादात गेल्या पस्तीस वर्षापासुन उजनी कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला शेतकऱ्याने वारंवार मागणी करून ही दिला तर नाहीच ऊलट त्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवली, त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट रोजी कुंटुबासह आत्मदहन करण्याचा इशारा रामहिंगणी, ता. मोहोळ येथील महिला शेतकर्‍याने दिला आहे.

या संदर्भात अधिक माहीती अशी की, रामहिंगणी येथील सुनिता खेला वाघमोडे व शाहीर खेला वाघमोडे या मायलेकरांची जमीन उजनी कालव्यात गेल्या पस्तीस वर्षापूर्वी सन 1985 मध्ये गेली आहे. आजुबाजुच्या शेतकर्‍यांच्या जमिनीही कालव्यात गेल्या आहेत. त्यांना मोबदला मिळाला. मात्र, या अन्यायग्रस्त शेतकर्याना मात्र मोबदला मिळाला नाही. भिमा पाटबंधारे विभागाने सकारत्मक भूमिका घेवून सहकार्य केले, परंतु वरील दोन्ही कार्यालयाने हेलपाटे मारूनही टाळाटाळ केल्याने आम्हास आजतागायत न्याय मिळाला नाही.

प्रांताधीकारी कार्यालय कुर्डुवाडी व उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन क्रं. 7 सोलापूर यानी गट नं. 94/2 हा सन 1985 साली कालव्यासाठी आरक्षीत केला. मात्र, आमच्या कार्यालयाकडे हा विषय येत नाही, असे सांगत मोबदला देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आम्हा दोघांचाच मोबदला संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यानी मागे का ठेवला, याबाबतचे गुढ अकलनीय आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यत मोबदला न दिल्यास विशेष भुसंपादन कार्यालय, प्रांत कार्यालय या कोणत्याही कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना मोबदला खात्रीलायक व्याजासह मिळणार असल्याने संबंधीत शेतकऱ्याने वेळोवेळी कर्ज घेतले असुन त्याची रक्कम मोठी झाली आहे. प्रत्येक वेळी यावर्षी मोबदला मिळेल या आशेवर वाघमोडे कुटुंब जगत आहे, मात्र अधिकारी विनाकारण विलंब लावत असल्याने हा अत्मदहनाचा निर्णय घेतल्याचे सुनिता वाघमोडे यांनी सांगीतले. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन क्रं. 7 सोलापूर, प्रांत कार्यालय कुर्डवाडी, तहसिल कार्यालय मोहोळ, पोलीस निरीक्षक मोहोळ याना पाठविल्या असल्याचे वाघमोडे कुटुंबीयांनी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया -

रामहिंगणी येथील वाघमोडे कुटुंबीयांचा प्रस्ताव माझ्याकडे परवाच्या दिवशी आला आहे तो तपासून लवकरात लवकर वाघमोडे कुटुंबीयांना न्याय देऊ.

- ज्योती कदम, प्रांताधिकारी, कुर्डूवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()