'उजनी' पर्यटन केंद्रासाठी सहा कोटींचा निधी मंजूर !

'उजनी' पर्यटन केंद्रासाठी सहा कोटींचा निधी मंजूर ! बोटिंग, पक्षी निरीक्षण केंद्राचा समावेश
उजनी धरण
उजनी धरण Gallery
Updated on
Summary

उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्र व्हावे यासाठी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे.

अकलूज (सोलापूर) : उजनी (Ujani Dam) जलाशय पर्यटन विकास केंद्र (Tourism Development Center) व्हावे यासाठी भाजपचे (BJP) नेते धैर्यशील मोहिते- पाटील (Dhairyshil Mohite-Patil) यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे. आता यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, सहा कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. या पर्यटन केंद्रात बोटिंग, पक्षी निरीक्षण केंद्र, मनोरंजनाची साधने व अन्य बाबींचा समावेश करण्यात येणार आहे.

उजनी धरण
'डीसीसी'च्या निवडणुकीला 31 मार्चपर्यंत ब्रेक ! सहकार विभागाचा आदेश

करमाळा तालुक्‍यातील वांगी येथे उजनीच्या बॅकवॉटरमध्ये 28 फेब्रुवारी 2021 रोजी नौकाविहार करत असताना नाविकाचे बोटीवरचे नियंत्रण सुटल्याने बोट उलटून अकलूज येथील पिता-पुत्राचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोहिते- पाटील यांनी येथील अपघात टाळण्यासाठी जलाशयामध्ये ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उजनी जलाशयाचा विकास व्हावा, अशी मागणी केली होती व त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये उजनी जलाशय हे नौकाविहार व रोजगार निर्मितीचे मोठे साधन आहे. यासाठी पर्यटकांची सुरक्षेची खबरदारी शासनाने घ्यावी. पर्यटनवाढीसाठी शासन स्तरावर पर्यटन विकास केंद्र, पक्षी निरीक्षण केंद्र, मत्स्य अभ्यास केंद्र, वनस्पती अभ्यास केंद्र व्हावे, पक्षी निरीक्षणासाठी ठिकठिकाणी टॉवर असावेत, अशी मोहिते-पाटील यांनी मागणी केली होती.

उजनी धरण
'उजनी'तून विमानसेवेचे ठिकाण निश्‍चित ! इंदापूरजवळील कालठणची निवड

उजनी येथील पर्यटन केंद्रासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून, जिल्हा नियोजन समितीमधूनही निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पर्यटन केंद्र सज्ज झाल्यानंतर ते बीओटी तत्त्वावर देण्यात येणार आहे. या पर्यटन केंद्रामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतील. त्यानंतर त्या परिसरात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. पर्यटकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक असे पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे धैर्यशील माहिते-पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.