शहरातील तरुणांची लसीसाठी ग्रामीणकडे धाव ! ग्रामीणमध्ये ऑन दि स्पॉट नोंदणी

शहरातील तरुणांची लसीसाठी ग्रामीणकडे धाव ! ग्रामीणमध्ये ऑन दि स्पॉट नोंदणी
Vaccine
VaccineMedia Gallery
Updated on

ग्रामीणच्या तुलनेत शहरासाठी लस कमी मिळत असल्याने आणि वारंवार लस संपत असल्याने ऑनलाइन नोंदणी करताना शहरातील तरुण ग्रामीणमधील केंद्र निवडत असल्याची बाब समोर आली आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 30 लाख 79 हजार 406 व्यक्‍तींना लस टोचण्याचे (Vaccination) टार्गेट आहे. मात्र, ग्रामीणच्या तुलनेत शहरासाठी लस कमी मिळत असल्याने आणि वारंवार लस संपत असल्याने ऑनलाइन नोंदणी करताना शहरातील तरुण ग्रामीणमधील केंद्र निवडत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील तरुणांचे लसीकरण ऑन दि स्पॉट नोंदणी करून आधार कार्ड व मोबाईलवरील ओटीपी पाहून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Young people in the city of Solapur are now going to rural areas to get vaccine)

Vaccine
मराठा आक्रोश मोर्चाला आलेल्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह !

लसीकरणावेळी फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, 45 वर्षांवरील को-मॉर्बिड रुग्ण (पूर्वीचा आजार असलेले रुग्ण) आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांना प्राधान्य दिले जात आहे. तसेच दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरलेल्यांनाही प्रामुख्याने लस टोचली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख 90 हजार व्यक्‍तींना पहिला तर दीड लाख व्यक्‍तींना दुसरा डोस दिला आहे. कोरोनाच्या (Covid-19) दोन लाट येऊन गेल्यांनतर आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. दुसऱ्या लाटेत अनेक तरुण (घरातील कर्ता पुरुष) कोरोनाचे बळी ठरले. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झालेला रुग्ण ऑक्‍सिजन (Oxygen), व्हेंटिलेटरविना (Ventilator) बरा होतो, असा अनुभव दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागाला आला. या पार्श्‍वभूमीवर लस टोचून घेण्यासाठी आता गर्दी वाढू लागली आहे. मात्र, जिल्ह्यासाठी मिळालेल्या एकूण लसीतील 30 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत लस शहरासाठी दिली जाते, तर उर्वरित लस ग्रामीण भागात वापरली जाते. या पार्श्‍वभूमीवर शहरातील तरुण लस टोचून घेण्यासाठी ग्रामीणमध्ये जात असल्याचा अनुभव अनेकांना आला. त्यामुळे आता ग्रामीणसाठी ऑनलाइन नोंदणी पद्धत बंद करण्यात आली आहे.

Vaccine
सोलापुरी चादर पाहून भारावला सोनू सूद ! "जय हिंद'ने दिली भेट

ग्रामीणमध्ये आता ऑन दि स्पॉट नोंदणी

शहर-ग्रामीणमधील लस आता पुन्हा संपली आहे. शहरात सोमवारी लसीकरण बंद राहील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुण्यावरून लस घेऊन जाण्याचा निरोप आला असून सोमवारी वाहन पाठविले जाईल, अशी माहिती जिल्हा समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. दरम्यान, शहरातील तरुण लसीकरणासाठी ग्रामीणमध्ये जात असल्याने आता ग्रामीण भागातील तरुणांचे लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून लस टोचली जाईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

लसीकरणातील बनावटगिरीला बसणार आळा

कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचताना अनेकांनी फ्रंटलाइन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स म्हणून नोंदणी करून लस टोचून घेतली आहे. तर काहींनी आधार क्रमांकाचा आधार घेऊन दुसऱ्याच्या नावे लस टोचल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा बनावटगिरीचा प्रकार थांबविण्याच्या निमित्ताने आता आधार कार्डसोबत असलेल्या आणि संबंधिताच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन करूनच त्यांना लस दिली जाईल, असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.