सोलापूर - पेट्रोल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज गुरुवारी अभिनव आंदोलन करण्यात आले. दुचाकी वाहनांमध्ये पिचकारीने थेंब थेंब पेट्रोल टाकून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
पेट्रोल डिझेल, ईंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज रोजी काँग्रेस भवन सोलापुर येथे सोलापूर शहर युवक काँग्रेस च्या वतीने सोलापुर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी दुचाकीस्वाराना प्रतीकात्मक थेंब थेंब पेट्रोल वाटप करत उपरोधिक आंदोलन करण्यात आले. तसेच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना ईमेल द्वारे निवेदन दिले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलच्या किंमती कमी होऊनही भारतात मात्र चढ्या दरानेच पेट्रोलची विक्री केली जात आहे. त्यात रोजच्या रोज वाढ होत आहे. हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात वाहनधारकांना पिचकारीने पेट्रोल भरावे लागेल. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पेट्रोलच्या किंमती कमी कराव्यात, अन्यथा भविष्यात युवक कॅंाग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
पेट्रोल डिझेल, ईंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज रोजी काँग्रेस भवन सोलापुर येथे सोलापूर शहर युवक काँग्रेस च्या वतीने सोलापुर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, मध्य अध्यक्ष योगेश मार्गम, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी दुचाकीस्वाराना प्रतीकात्मक थेंब थेंब पेट्रोल वाटप करत उपरोधिक आंदोलन करण्यात आले. तसेच माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना ईमेल द्वारे निवेदन दिले.
शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केली आहे. भविष्यात असेच ईंधन दरवाढ होत राहिले तर नागरिकांना गरजेपुरते थेंब थेंब, किंवा 50 मिली किंवा 100 मिली असे पेट्रोल घ्यावे लागेल म्हणून आज रोजी दुचाकीस्वाराना प्रतीकात्मक थेंब थेंब पेट्रोल वाटप करत उपरोधिक आंदोलन करण्यात आले.
2014 साली मोदी सरकारने 30 ते 35 रुपये दरात पेट्रोल देऊ म्हणून आश्वासन दिले होते. पण आज पेट्रोलचे दर 85 रुपये, डिझेल चे दर 76 रुपये झाले आहेत. गेल्या नऊ दहा दिवसात नऊ वेळा पेट्रोल डिझेल, इंधनाच्या दरात वाढ केली आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना लाखो रुपये फायदा होत आहे आणि जनतेचा खिसा खाली होत आहे. वास्तविक पाहता जागतिक बाजारपेठेत इंधनाचे प्रती बैरल चे दर चाळीस डॉलर इतके ऐतिहासकरित्या कमी झाले आहेत. तेच दर 2014 साली काँग्रेस सरकारच्या काळात एकशे दहा ते एकशे चाळीस बैरल प्रति बैरल च्या आसपास होते. जनतेला वाटले की आत्ता पेट्रोल डिझेल, इंधनाचे दर कमी होतील पण केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर कर वाढवून दरवाढ करत आहे. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असुन उद्योगधंदे ठप्प आहेत, रोजगाराचा पत्ता नाही, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला बाजारपेठ व भाव नाही, देशातील सप्लाय चेन आधीच अडचणीत असुन या ईंधन दरवाढी मुळे वाहतूक दरात वाढ होऊन अजुन प्रचंड महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा खाली असून केंद्र सरकार ईंधन दरवाढ करुन जनतेला लूटत आहे. या दरवाढी मुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले असुन ईंधन दरवाढ कमी करावी म्हणून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करुन ईंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी करत आहोत. यावेळी प्रवीण जाधव, राजासाब शेख, सुभाष वाघमारे, शरद गुमटे, रोहित भोसले, योगी देशपांडे, आदि उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.