'टक्केवारी' प्रकरण : झेडपी अध्यक्षांच्या पीएला सीईओंची नोटीस

'टक्केवारी' प्रकरण : झेडपी अध्यक्षांच्या पीएला सीईओंची नोटीस
Solapur ZP
Solapur ZPCanva
Updated on
Summary

11 ऑक्‍टोबरला बजावलेल्या नोटिशीवर स्वीय सहाय्यक मोहिते काय खुलासा देणार? यावर याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur ZP) अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे (Aniruddha Kambale) यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते (Suryakant Mohite) यांच्यावर 'टक्केवारी'चा आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 11 ऑक्‍टोबरला बजावलेल्या नोटिशीवर स्वीय सहाय्यक मोहिते काय खुलासा देणार? यावर याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Solapur ZP
विधान परिषदेच्या आठ जागांसाठी पुन्हा 'महाविकास'विरुद्ध भाजप!

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे स्वीय सहाय्यकामार्फत फाईल मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी केला होता. यासंदर्भात प्रसार माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या सर्वांची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वीय सहाय्यक सूर्यकांत मोहिते यांना कारणे दाखवा नोटीस 11 ऑक्‍टोबरला बजावली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अधीक्षक) या पदावर कार्यरत असलेल्या मोहिते यांना ही नोटीस शिक्षण विभागाने बजावली आहे.

नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत या संदर्भातील खुलासा द्यावा, अशी सूचना यामध्ये करण्यात आली आहे. मोहिते यांच्याकडून अद्यापपर्यंत खुलासा प्राप्त झालेला नाही. या खुलाशामध्ये ते काय माहिती देतात? यावर या प्रकरणाचे गांभीर्य अवलंबून आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अनिल मोटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र देत जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक मोहिते यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या मागणीचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला 18 ऑक्‍टोबरला मिळाले आहे. हे पत्र मिळण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी 11 ऑक्‍टोबरला स्वीय सहाय्यक मोहिते यांना नोटीस बजावली आहे.

Solapur ZP
मी हरलोय पण थकलो नाही! सोपलांची गर्जना; 'महाविकास'ने थोपटले दंड

सर्वसाधारण सभेकडे लक्ष

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. 25) सकाळी 11 वाजता होणार आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने झाली नव्हती. सोमवारी अनेक महिन्यांनंतर सभा ऑफलाइन पद्धतीने होत आहे. त्यातच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या टक्केवारीचा विषय समोर आला आहे. आगामी निवडणुकांची आचारसंहिता पाहता जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची ही शेवटचीच सर्वसाधारण सभा मानली जात आहे. या सभेत टक्केवारीचा विषय पेटणार, की एकमेकांचे कौतुक करत ही सर्वसाधारण सभा निरोप समारंभाची सभा ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.