तुळजापूर : विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त पद कोणाकडे जाणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या विश्वस्तांमध्ये विद्यमान आमदार तसेच तुळजापूरचे विद्यमान नगराध्यक्ष हे तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त असतात. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमदार म्हणून निवड झालेले लोकप्रतिनिधी हे विधीमंडळात जातात.