कोल्हापूरकरांनो, वेगमर्यादेचे उल्लंघन कराल तर अडचणीत याल

speed gun van in Kolhapur Traffic police
speed gun van in Kolhapur Traffic police
Updated on

कोल्हापूर - "शहर वाहतूक शाखेकडे आता स्पीडगन व्हॅन दाखल झाल्याने वेगमर्यादेचे उल्लंघन कराल तर चांगलेच अडचणीत याल,' असे म्हणण्याची वेळ आली आहे. अत्याधुनिक अशा व्हॅनमध्ये वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा छायाचित्रासह डाटा प्राप्त होणार आहे. त्याआधारे संबंधितावर ई-चलनाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. 

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखेमार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. धूम स्टाईलने वाहन चालविणाऱ्यांमुळे अपघाताचे प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता ही कारवाई डिजिटल व्हॅनद्वारे करणार येणार आहे. यात व्हिडिओ बेस्ड लेजर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम आहे. ही स्पीडगन व्हॅन त्यातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा तपासून त्याचा डाटा मोटारीत प्राप्त होणार आहे.

पुराव्यासाठी संबंधित वाहन चालकाचे छायाचित्रही प्राप्त होणार आहे. त्याआधारे संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई आता केली जाणार आहे. सध्या धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्यांविरोधात एक हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अपघात कमी करण्यासाठी वेगमर्यादा उल्लंघन, मद्यसेवन करून वाहन चालविणे, मोटारीला काचा बसविणाऱ्यावर या स्पीडगन व्हॅनद्वारे कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांनी व्यापक पद्धतीने सुरू केली आहे. 

स्पीड गन व्हॅनची वैशिष्ट्ये 
300 मीटर पर्यंतची वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने येणार कक्षात  लेझरद्वारे नंबर प्लेट आधारे संबंधितावर होणार कारवाई दंडाची रक्कम थेट ई-चलनावर अपलोड होणार 
फिल्मिंग केलेली वाहनांची लेझरद्वारे छायाचित्रे हाती येणार 
आवाजावरून मद्यपी चालक शोधणे होणार शक्‍य 

शहर वाहतूक शाखेकडे स्पीडगन व्हॅन उपलब्ध झाले आहे. त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीनंतर व्हॅनद्वारे कारवाईची मोहीम सक्षमपणे राबवली जाईल. 
 - अनिल गुजर,
पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.