शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेस प्रारंभ 

Start of the school national badminton tournament
Start of the school national badminton tournament
Updated on

नगर : वाडिया पार्कमधील बॅडमिंटन हॉलमध्ये आज 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या शालेय 65व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा प्रारंभ झाला. स्पर्धा रविवारपर्यंत (ता. पाच) चालेल. स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर मालन ढोणे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे आदी उपस्थित होते. 

वाडिया पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आज सकाळी नऊ वाजेपासून सामने सुरू झाले. संपूर्ण देशातून सुमारे 65 संघ शहरात दाखल झाले आहेत. स्पर्धेचे नियोजन स्कूल गेम फेडरेशनचे निरीक्षक अजय मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था बडी साजन मंगल कार्यालय, इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन व केशर गुलाब मंगल कार्यालयात आणि भोजन व खेळण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे केली आहे. 

अवश्‍य वाचा - प्राथमिक शिक्षक बॅंकेचा अजब कारभार 
 
मंत्र्यांनी फिरविली पाठ 
नगर शहरात पहिल्यांदाच शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा होत आहे. स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे यांच्यासह खासदार, आमदार यांना निमंत्रण होते. मात्र, जिल्ह्यातील तीनही मंत्री जिल्ह्यात असूनही त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचे टाळले, अशी चर्चा आज जिल्हा क्रीडा संकुलात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.