फलटण शहर ः येथील मुधोजी महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर विभागाच्या वतीने मराठी राजभाषादिनाच्या निमित्ताने उद्या (ता. 27) पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
श्रीमंत निर्मलादेवी साहित्य व संस्कृती मंच फलटण, मराठी विज्ञान परिषद शाखा फलटण व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर या संस्थांच्या सहयोगाने हे संमेलन होणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षा फलटण पालिकेच्या नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर या राहणार असून, प्राचार्य विश्वासराव देशमुख यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
वाचा : ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत
संमेलनामध्ये "पाझर मातृत्वाचा' या गणेश तांबे संपादित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. संमेलनामध्ये प्र-प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली "अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील समाजदर्शन' या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात डॉ. हणमंतराव पोळ हे प्रमुख वक्ते म्हणून विचार मांडणार आहेत. संमेलनाच्या अखेरच्या सत्रात प्रसिद्ध कवी व पत्रकार विकास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यात डॉ. नवनाथ रासकर, प्रा. जयश्री शेंडे, डॉ. मारुती काटकर, आरती शिंदे, प्रा. सुहास पवार, आशा दळवी, अनिता पंडित, दत्ता कदम, राहुल निकम, संतोष दुरगुडे, सारंग यादव, अर्चना सुतार, रमाकांत दीक्षित, राहुल कोळी, नवनाथ कोळवडकर व बाळासाहेब रणपिसे आदी कवी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचा साहित्य रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन साहित्य संमेलनाचे संयोजक प्रा. डॉ. प्रभाकर पवार व महाविद्यालयाचे प्र-प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी केले आहे.
नक्की वाचा : ...तर राज्यातील एकही नाट्यगृह रिकामे राहणार नाही : मकरंद अनासपुरे
जरुर वाचा : अखेर मृत्यूच्या दाढेतून भारतीय परतणार
हेही वाचा : Video : जेव्हा पाेलिस धावून येतात पालिकेच्या मदतीला
वाचा : वाचक संख्या मर्यादित..! मराठी वाचनालयांतून अनुदानाची दुकानदारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.