शिर्डी : कर्ज काढून मोठ्या दिमाखात विवाह सोहळे करणे हे मराठा कुणबी समाजाची आर्थिक स्थिती दयनीय होण्याचे एकमेव कारण आहे. हुंडा ही प्रथा मोडून काढत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करावेत, असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एल. पी. पटेल यांनी केले.
हेही वाचा शाळकरी मुलीचे अपहरण करून अत्याचार
शिर्डीत कुणबी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन
अखिल भारतीय कुणबी समाजाच्या 44व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महासंघाचे महासचिव डॉ. व्ही. एस. निरंजन, ब्रिगेडिअर सुधीर सावंत, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक संजीव भोर, जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले आदींसह स्थानिक पदाधिकारी व देशातील कुणबी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनात देशातील विविध भाषेतील व क्षत्रिय समाजाचे 25 राज्यांतील चार हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
कुणबी समाज एका छताखाली आणणार
पटेल पुढे म्हणाले, की एकट्या महाराष्ट्रात कुणबी समाजाची लोकसंख्या सात कोटी 20 लाख आहे. म्हणजे देशाच्या 25 टक्के एवढी लोकसंख्या महाराष्ट्रात असून, सर्वांना एका छत्राखाली आणणार आहे. या महाअधिवेशनासाठी देशातील उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, केरळ, आसाम, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, गोवा, राजस्थान, हरियाना, कर्नाटक, झारखंड, बिहार आदी राज्यांतून मोठ्या संख्येने समाजाचे प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक सहभाग महिलांचा असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात कुर्मी क्षत्रिय मराठा समाजाची संख्या 22 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात 60 टक्के विवाह सोहळे हे कर्ज काढून केले जातात. त्यामुळे समाज कर्जात बुडत आहे. हुंडा प्रथा मोडीत काढून विवाह सोहळे सामुदायिक रीतीने करण्यात यावेत.
हेही वाचा मुलाच्या जाण्याने वडिलांचाही गेला प्राण
महिलांच्या सुरक्षेसाठी एक व्हावा : सावंत
ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले, की कुणबी समाज शेतकरी असून, त्यांची संख्या मोठी असताना शेतकरी बेहाल आहेत. 1988 नंतर पहिल्यांदाच सर्वजण एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल होते, म्हणून देश एकत्र झाला. देशाला एकत्र ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महिलांच्या सुरक्षेसाठी समाजाने एक होणे गरजेचे आहे.
अधिवेशन यशस्वी होण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयकुमार ठुबे, डॉ. मंगेश देशमुख, क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एस. एल. तांबे, नितीन देशमुख, बळिराजा शेतकरी संघटनेचे विजय काकडे, माधव देशमुख, व्यंकट शिंदे, धनंजय जोगदंड, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, रवींद्र वाघ, मदन मोकाटे, संतोष भोकरे, संतोष घोलप, अशोक काजळे आदी समाजबांधव प्रयत्नशील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.