Students Get Together : ४७ वर्षांनी एकत्र शिकलेले विद्यार्थी आणि जाग्या झाल्या जुन्या आठवणी

कोण शिक्षक, कुणी प्राध्यापक, डॉक्टर तर कुणी शेतकरी, पोलीस सेवेतील सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले. तेच भवानीनगर ( ता.वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन १९७७ सालच्या तुकडीचे सवंगडी ४७ वर्षानंतर एकत्र आले.
Students Get Together
Students Get Togethersakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : कोण शिक्षक, कुणी प्राध्यापक, डॉक्टर तर कुणी शेतकरी, पोलीस सेवेतील सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले. तेच भवानीनगर ( ता.वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन १९७७ सालच्या तुकडीचे सवंगडी ४७ वर्षानंतर एकत्र आले. आणि त्यावेळच्या गंमती जमती, रुसवे फुगवे आणि शिक्षकांच्या तक्रारी आठवून आठवून शेवटी गेले ते दिवस असे म्हणत आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यामध्ये आनंदाने सामील झाले. एकच धम्माल उडवून दिली.

क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या सन १९७७ सालच्या तुकडीने स्नेह मेळावा घेण्याचे ठरवले आणि त्यावेळच्या मित्र-मैत्रिणीची , पत्ते आणि मोबाईल नंबर शोधून रविवारी २८ एप्रिल रोजी हा स्नेह मेळ्याचा दिवस ठरविला. फक्त मित्र-मैत्रिणीच नव्हे तर तत्कालीन शिक्षकांशी देखील संपर्क साधून त्यांना देखील ह्या स्नेह मिळाव्याचे निमंत्रण देण्यात आले आणि सुरू झाली मनातील एक उत्सुकता आणि उत्साह कोण कोण येणार आणि कोण कोण भेटणार याविषयी अंदाज बांधत ५० हून अधिक मित्र मैत्रिणी आणि शिक्षक यांनी या मेळाव्याला हजेरी लावली.

४७ वर्षानंतर भेटलेले या सवंगड्यांनी एकमेकांना आपली कौटुंबिक माहिती आणि जुन्या आठवणी सांगत संपूर्ण दिवस आनंदात तर घालवलाच परंतु दरवर्षी यापेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे ठरवून मेळाव्याचा आनंद घेतला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक एस. डी. निकम हे व प्रमुख पाहुणे म्हणून भवानीनगर आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल गौर हे उपस्थित होते.

यावेळी त्यांनी साठ वर्षानंतरचे सेवानिवृत्तीचे आयुष्य आनंदाने कसे जगावे याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा नंदकुमार मालेकर, हरिभाऊ सावंत, जगन्नाथ मोरे, शिरीष बेले, शशिकला कळसे, चंद्रकांत कुंभार, महादेव सूर्यवंशी, पोपट काटकर, काकासो कुरळे, प्रतिभा कदम, मंगल पवार, बाजीराव मोहिते, मीनाक्षी कणसे आदी मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांचे हस्ते हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. नलवडे यांनी व आभार प्रदर्शन क्रांतिसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डी. पवार यांनी केले. हा स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी हरिभाऊ सावंत, शिरीष बेले, बाजीराव मोहिते, पोपट काटकर, उत्तम माळी, शशिकला कळसे या माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com