वावर हाय तर पॉवर हाय! दुष्काळाशी सामना करत 75 वर्षाच्या शेतकऱ्यानं 5 एकर डाळिंबातून घेतलं तब्बल 75 लाखांचं उत्पादन

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्‍य; मात्र स्वच्छ हवामानामुळे पहिल्यापासूनच डाळिंबात यश मिळत गेले.
Success Story Yamaji Patilwadi Farmer
Success Story Yamaji Patilwadi Farmeresakal
Updated on
Summary

नारायण चव्हाण यांचे ७५ वर्षे वय असले तरी डाळिंबातील प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यास वाखाणण्याजोगे आहे. सध्या अठरा एकर क्षेत्रावर चार हजार आठशे झाड आहेत.

आटपाडी : गेली चाळीस वर्षे दुष्काळाशी दोन हात करत भोंड्या माळावर डाळिंबाची शेती (Pomegranate Farming) करणाऱ्या यमाजी पाटीलवाडी (यपावाडी) येथील ७५ वर्षीय शेतकऱ्याने (Farmer) डाळिंबाच्या चार हजार ८०० झाडांतून विक्रमी ८० टनातून ७५ लाखांचे उत्पादन काढले आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन, त्याची अंमलबजावणी आणि प्रदीर्घ अनुभवातून हे यश त्यांनी मिळवले आहे.

Success Story Yamaji Patilwadi Farmer
कर्नाटकातील स्वस्त डिझेलची महाराष्ट्रात विक्री; दररोज 30 हजार लिटरचा पुरवठा, सीमाभागातील अनेक पंपांना फटका

या आदर्शवत शेतकऱ्याचे नारायण तातोबा चव्हाण (Narayan Tatoba Chavan) असे नाव आहे. नारायण चव्हाण यांनी तालुक्यात पहिल्यांदा १९७९ मध्ये डाळिंब उत्पादक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्याकडून रोपे आणून लागवड केली. कसलाही अनुभव नसताना अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेऊन उत्पादन सुरू केले. मुळात आटपाडी तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो.

Success Story Yamaji Patilwadi Farmer
सरकारचा विरोध असतानाही सीमाभागातील 865 गावांना मिळणार महाराष्ट्राच्या 'या' योजनेचा लाभ; कसं ते जाणून घ्या..

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्‍य; मात्र स्वच्छ हवामानामुळे पहिल्यापासूनच डाळिंबात यश मिळत गेले. त्यांची याआधी २५०० झाडे होती. गत वर्षी नवीन लागवड केल्याने ४८०० वर पोहोचली आहे. यशामुळे त्यांची डाळिंबात गोडी वाढत गेली ४२ वर्षे त्यांनी डाळिंबात स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांचा डाळिंब बागेतच सूर्य उगवतो आणि मावळतो. एवढे ते बागेशी एकरूप झालेत. बाग सोडून तालुका जिल्हा किंवा अन्य गावांत जात नाहीत. डाळिंबाचे ज्ञान मिळवण्यासाठी ते बाहेर जात.

नारायण चव्हाण यांचे ७५ वर्षे वय असले तरी डाळिंबातील प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यास वाखाणण्याजोगे आहे. सध्या अठरा एकर क्षेत्रावर चार हजार आठशे झाड आहेत. यापूर्वी २५०० होते. एकावेळी सर्वच बाग न धरता तीन टप्प्यांत धरतात. बागेतील रोजच्या कामासाठी दोन कुटुंब कायमस्वरुपी शेतात ठेवली आहेत. त्यांना वर्षभराचा रोजगार दिला जातो. तीन विंधन विहिरी, दोन विहिरीतून पाण्याची सोय केली आहे. ट्रॅक्टरच्या बोअरवेलने फवारणी केली जाते. बागेत कट्टे केलेत. फळांचे उन्हापासून संरक्षणासाठी आच्छादन आणि स्लरीचा वापर करतात.

Success Story Yamaji Patilwadi Farmer
Gokul Dudh Sangh : दुधाचा 'गोकुळ-शक्ती' नवा ब्रँड मुंबई गाजवणार; मंत्री हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

२४ लाख खर्च

यंदा पहिल्यांदाच चार हजार आठशे झाडाचे तीन टप्पे करून एप्रिल, जून आणि जुलैमध्ये हंगाम धरला. यापूर्वी २५०० झाडे धरत होती. आतापर्यंत त्यांना १२८, १२०, ११०, १००, ९० ते सर्वांत कमी साठ रुपये भाव मिळाला आहे. आतापर्यंत ७० टन उत्पादन निघाले आहे. अजून सातशे झाडाचा प्लॉट शिल्लक आहे. त्यासाठी २४ लाख रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी ते अशा पद्धतीने उत्पादन काढण्यात यश मिळवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.