Sugarcane Crushing : साखर हंगाम चालणार २० एप्रिलअखेर

शेतकरी चिंतेत; गाळप वाढले, उतारा घटला
Sugarcane crushing season till 20th April Farmers worried sangli agriculture
Sugarcane crushing season till 20th April Farmers worried sangli agriculture sakal
Updated on

सांगली : यावेळी ऊस वेळेवर गाळपासाठी शेतकऱ्यांची धावाधाव होणार, अशी हंगामाच्या सुरुवातीलाच चर्चा होती. सध्या जिल्ह्यात व राज्यातील चित्र मात्र विरोधाभासाचे आहे. यंदा अतिवृष्टी व त्यानंतरही परतीच्या पावसामुळे जोरदार हजेरी लावली.

ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. ऊस उतारा घटला. कारखान्यांच्या प्रतिदिन ऊस गाळप क्षमतेत वाढ झाली. त्यामुळेही उसाचे गाळप लवकर पूर्ण होत आहे. जिल्ह्याचा विचार केला, तर कर्नाटक सीमाभाग, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे ऊस गाळपास जात आहे. यंदाचा हंगाम लवकरच आटोपणार आहे. बॉयलर २० एप्रिलअखेर थंडावेल, असे चित्र आहे.

महाराष्ट्रात यंदाचा हंगाम गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ ते ६० दिवस आधीच संपण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ७० लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. नोंदणी झालेले २५ टक्के क्षेत्र शिल्लक आहे. पाच-दहा टक्के ऊस कर्नाटक सीमाभाग व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी घेतला आहे. यंदा कारखान्यांच्या दैनिक गाळप क्षमतेत वाढ झाली आहे.

उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू असल्याने पुढे अडीच महिन्यांत म्हणजे १५ ते २० एप्रिलअखेर ऊस गाळप पूर्ण होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातून व्यक्त केला आहे. यंदा जादा पावसामुळे उत्पादनात घट आहे. ऊस उपलब्धता कमी असेल. कारखान्यांची धुरांडी लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत.

गेल्यावर्षी एक ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या २०२२-२३ च्या हंगामात महाराष्ट्रात १२८ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. यावरून हंगामाच्या सुरुवातीला मात्र १३८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला. तो चुकला आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादन कमी झाल्याने देशातील साखर उत्पादनावर परिणाम होणार आहे.

राज्यात १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली. तसेच कारखाने सुरू होण्याचे प्रमाण सुरुवातीपासूनच चांगले होते. ऊस गाळप क्षमतेत वाढ झाल्यामुळेही वेळेत उसाचे गाळप पूर्ण होण्यास मदत होत आहे.

- पांडुरंग शेळके, साखर सहसंचालक (विकास)

यंदा प्रतिएकरी उसाचे टनेज घटले शिवाय साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढवली. शेजारील सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम संपले आहेत. वर्षात १६० दिवस गाळप झाले, तरच कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. अन्यथा सोलापूरप्रमाणे अन्य जिल्ह्यांतही झळ बसेल. खर्च वाढण्यात त्यांचा परिणाम होईल.

- शरद मोरे, जनरल मॅनेजर, श्री दत्त इंडिया, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.