Sugarcane Season : बेळगावसह उत्तर कर्नाटकात 15 नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम सुरू होणार; महाराष्ट्रात कधी?

Sugarcane Season : या निर्णयामुळे सीमाभागातील साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा ऊस उत्पादन कमी झाले आहे.
Sugarcane Season
Sugarcane Seasonesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र आणि कर्नाटक (Karnataka) राज्यांत मोठ्या स्वरूपात ऊस उत्पादन घेतले जाते. दोन्ही राज्यांतील सीमेवर उसाची पळवापळवी केली जाते.

बेळगाव : बेळगावबरोबरच उत्तर कर्नाटक भागातील ऊस गळीत हंगाम (Sugarcane Season) येत्या १५ नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे. कर्नाटक साखर आयुक्तालयाकडून तसा आदेश बजावण्यात आला आहे. यामुळे शेजारच्या राज्यातील उसाची पळवापळवी थांबणार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक (Karnataka) राज्यांत मोठ्या स्वरूपात ऊस उत्पादन घेतले जाते. दोन्ही राज्यांतील सीमेवर उसाची पळवापळवी केली जाते. या उद्देशाने बेळगाव आणि उत्तर कर्नाटक भागांतील साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम सुरू करण्याबाबतचे निर्देश बजावले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अगोदर हंगाम सुरू होऊन उसाची होणारी पळवापळवी थांबणार आहे.

Sugarcane Season
तुम्हाला कानडी येतं का? नसेल तर शिकून घ्या...; शिक्षण खात्याचा अजब निर्णय, शिक्षकांना दिले उद्दिष्ट

या निर्णयामुळे सीमाभागातील साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा ऊस उत्पादन कमी झाले आहे. यामुळे ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यंदा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर महाराष्ट्र सरकारने एक नोव्हेंबरपासून परवानगी दिली. त्यामुळे बेळगावसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, आजरा, चंदगड, सांगली भागातील कारखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.

Sugarcane Season
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारण्यात येणार; आयुर्मान असणार 100 वर्षे

जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्‍यात उसाची पळवापळवी करता येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, संपूर्ण कर्नाटकमध्ये गळीत हंगाम एक नोव्हेंबरला सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, बेळगाव आणि उत्तर कर्नाटकात १५ नोव्हेंबरला गळीत हंगाम सुरू करण्याचे आदेश आहेत. त्यापूर्वी कारखान्यांनी ऊस गाळप करू नये, असे निर्देश आहेत.

Sugarcane Season
महाराष्ट्रातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; अजितदादांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

बेळगाव व उत्तर कर्नाटकातील ऊस गळीत हंगाम संदर्भात साखर मंत्रालयाकडून आदेश जारी झाला आहे. त्यात या भागामधील गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करण्याबाबत आदेश बजावला आहे.

-मल्लिकार्जुन नायक, उपसंचालक, अन्न-नागरी पुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.