मूळचा मुंबईचा असणारा सिद्धांत हा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता.
मिरज : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सिद्धांत सुरेश तांबे (वय 19) या मुंबईतील विद्यार्थ्याने कर्मवीर भाऊराव चौकात वास्तव्यास असलेल्या अपार्टमेंट मधील खोलीमध्ये आत्महत्या केली.
या घटनेची मिरज शहर पोलीस (Miraj City Police) ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या वर्गात शिकणारा सिद्धांत तांबे (MBBS Student) हा मिरजेतील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातील एका अपार्टमेंट मध्ये भाड्याने राहत होता.
मूळचा मुंबईचा असणारा सिद्धांत हा मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. वैद्यकीय महाविद्यालयात सध्या या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान, सकाळी तो कॉलेजला आला नसल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला मोबाईल वर फोन केला.
मात्र, तो प्रतिसाद देत नसल्यामुळे मित्राने तो राहत असलेल्या अपारमेंटकडे धाव घेतली. यावेळी दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज दिल्यानंतर ही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मित्रांनी दरवाजा तोंडून आत प्रवेश केला असता. सिद्धांत याने किचन मध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
पेपर अवघड गेल्याचे नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.