नवेखेड : एकरकमी एफआरपी (FRP) मागणाऱ्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्या कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांना डॉ. सुरेश भोसलेंनी आवरावे, अन्यथा वाळवा तालुक्यात फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव यांनी दिला. (swabhiman shetkari sanghtana) रेठरे हरणाक्ष येथील कृष्णा कारखान्याच्या निवडणुक सहकार पॅनेलची सभा झाली. अध्यक्ष मदन मोहिते यांनी एकरकमी एफआरपी मागणे चुकीचे आहे. शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीसाठी केलेले आंदोलन चुकीचे आहे. पूर्वी पहिले, दुसरे, तिसरे, व फायनल असे बील मिळत होते, ते तसेच मिळाले पाहिजे. कुणाला पाहिजे, एक रकमी एफआरपी असे वक्तव्य त्यांनी केले.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माणनाऱ्या संभासदाच्या भावना संतप्त झाल्या. त्याना मोहिते यांचे बोलणे खटकले आहे. वास्तविक राजु शेट्टी यांनी या निवडणुकीत कोणत्याच पँनेलला समर्थन दिले नव्हते. कार्यकर्ते ना आपल्या स्थानिक पातळीवरील निर्णय घ्यावा, असे सुचित केले होते. असे असताना मदन मोहिते यांनी थेट स्वाभिमानीच्या एकरकमी आंदोलनाची खिल्ली उडवली हे चुकीचे आहे. त्यांचे हे बोलणे एकतर्फी आहे, मदन मोहिते यांचे वय ७५ आसपास आहे" साठी बुध्दी नाठी" अशी अवस्था झाली आहे. त्यांनी आता घरात बसावे. असा टोला जाधव यांनी यावेळी लगवला.
"मदन मोहिते यांच्या एक रकमी एफआरप मुळे व्याजाचा भुर्दंड कारखान्याला बसतो हे जसे माहिती आहे, तसेच एफआरपीच्या तुकड्याने शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करताना ती वेळेत न झाल्याने शून्य टक्क्यांचे कर्ज व्याजसह भरावे लागते हे माहीत नाही काय?"
- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.