सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटाच्या पायथ्याशी तळोशी हे सुमारे साडेतीनशे लोकवस्तीचे गाव आहे. डोंगराच्या उतारावर वसलेल्या तळोशीपासून विकासाची गंगा नेहमीच दूर राहिली. स्वच्छता अभियान आणि निर्मलग्राम अभियानामुळे या गावाला श्रमदानाची गोडी लागली आणि त्यातून या गावाने लक्षणीय प्रगती साधली. डोंगर उताराला भातशेती करून येथील ग्रामस्थ आपले जीवन कंठत असतात. महाबळेश्वरसारख्या गिरिस्थानानजीकच हे गाव असल्याने येथे होणारा पाऊसही मोठा. मात्र, सारे पाणी उताराने वाहून जाते. यामुळे येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर खाचरात भाताचे पीक घेतात.
गावाची शेती पाण्याखाली यावी यासाठी काही काळापूर्वी तत्कालीन सरपंच (कै.) राजाराम चिकणे यांनी शासनाची मदत अन् गावकऱ्यांच्या श्रमदानातून शिवकालीन तळे आकारास आणले. हेच तळे गेल्या काही वर्षांत डोंगरातून येणाऱ्या पाण्यामुळे गाळाने भरून गेले होते. तनिष्कांच्या मागणीनुसार ‘सकाळ रिलीफ फंडा’ने दिलेल्या दोन लाखांच्या मदतीला श्रमदानाची साथ देत गावकऱ्यांनी नुकतेच तळे गाळमुक्त केले. त्यातून गावाच्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तेथे नुकतेच श्रमदान केले. आता उर्वरित खड्डे गावकरी श्रमदानातून काढत आहेत. पाऊसमान भरपूर असूनही गावाला एप्रिल-मेमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी जलस्वराज्य योजनेमधून पाच लाख लिटर क्षमतेची साठवण टाकी बांधण्याचे नियोजन केले असून, हे कामही शासनाच्या मदतीला श्रमदानाची जोड देऊन केले जाणार असल्याची माहिती सरपंच संतोष चिकणे यांनी दिली.
शोषखड्ड्यांचे काम पूर्ण
‘‘जलस्रोतात सांडपाणी मिसळण्याने सर्व लोक ‘स्लो पॉयझन’च घेत असतात. ही समस्या सर्वांना भेडसावत असतानाही, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, तळोशी गावाने सांडपाणी व्यवस्थापनाचा विडा उचलला असून, प्रत्येक घराला शोषखड्डा काढला जात आहे. त्यातून ५५ कुटुंबांपैकी ४० कुटुंबांनी शोषखड्ड्यांचे काम पूर्ण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.