Tasgaon Farmers : भारताला 'तो' मान मिळवून देण्यात तासगावचा मोठा वाटा; इथला शेतकरी कमावतोय 'विदेशी चलन'

जगाच्या बाजारात निर्यात करणाऱ्या देशांचा बोलबाला असतो.
Tasgaon Farmers Grape Pomegranate Crops Foreign Currency
Tasgaon Farmers Grape Pomegranate Crops Foreign Currencyesakal
Updated on
Summary

आखाती देश, युरोप आणि रशिया या देशात इथली द्राक्ष जातात. तालुक्यातून दीड हजार टन द्राक्षाची निर्यात होत असते.

तासगाव : सावळज येथील बाळू लोखंडे या मंडपवाल्याच्या खुर्च्या लंडनमध्ये दिसल्याचे भारी कौतुक झाले होते. मात्र, त्याआधी इथली द्राक्ष आणि बेदाणा सातासमुद्रापार पोहोचला होता. इथल्या शेतकऱ्यांनी (Tasgaon Farmers) प्रचंड कष्टातून, प्रयोगातून, जागतिक निकषांच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध करत जगाच्या बाजारात स्थान मिळवले आहे.

त्यातून विदेशी चलन (Foreign Currency) मिळते आहे. जगाच्या बाजारात निर्यात करणाऱ्या देशांचा बोलबाला असतो. भारताला तो मान देण्यात तासगावच्या द्राक्षांचा क्रमांक अग्रक्रमाने लागतो. एकेकाळी दुष्काळी असलेला आणि कमी पाण्याच्या द्राक्षभूमीतील शेतकरी ऊस आणि अन्य फळपिकांकडे वळू लागला आहे.

Tasgaon Farmers Grape Pomegranate Crops Foreign Currency
Maratha Reservation : तुमच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा तत्काळ वटहुकूम काढा; सतेज पाटलांचं सरकारलाच चॅलेंज

गत वीस वर्षांत बदलत्या काळात शेतीचे अर्थकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. नुसत्या शेतीतून आणि शेतीपूरक व्यवसायांमधील उलाढालीचे आकडे डोळे फिरवणारे आहेत. आखाती देश, युरोप आणि रशिया या देशात इथली द्राक्ष जातात. तालुक्यातून दीड हजार टन द्राक्षाची निर्यात होत असते.

वीस वर्षांपूर्वी तासगावची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. एकेकाळी टँकरने पाणी घालून शेतकऱ्यांनी द्राक्षबागा जगविल्या. मात्र आरफळ, ताकारी, टेंभू योजनेंतर्गत विसापूर-पुणदी योजना कार्यान्वित झाली आणि फिरलेल्या पाण्याने शेतीचा चेहरामोहरा बदलून गेला आहे.

शेतीला पाणी असल्यास त्यातून शेतकरी सोने पिकवू शकतो. हा झालेला बदल सकारात्मक असा आहे. द्राक्ष हे कमी पाण्याचे पीक असले, तरी आणि तालुक्याचा मोठा भाग पाण्याखाली आला असला, तरी येथील अर्थकारण आजही द्राक्षपिकाभोवती फिरते आहे, असे चित्र कायम आहे.

Tasgaon Farmers Grape Pomegranate Crops Foreign Currency
Maratha Reservation : संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं, तेव्हा फडणवीसांनीच मराठा समाजाला..; आरक्षणाबाबत महाडिकांचं मोठं वक्तव्य

मात्र हे चित्र अलीकडच्या काळात बदलू लागले आहे. बेदाणा बाजारपेठेत ८-१० हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असली, तरी त्यात तासगाव तालुक्यातील बेदाण्याचा वाटा २५ टक्क्यांहून कमी आहे. पाणी आल्यानंतर द्राक्षशेती वाढलीच, मात्र ऊस शेती प्रचंड वाढू लागली आहे. द्राक्षशेतीचा लंबक ऊस आणि अन्य पिकांकडे झुकू लागल्याचे चित्र आहे.

Tasgaon Farmers Grape Pomegranate Crops Foreign Currency
Maratha Reservation : 'मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, OBC आरक्षणातील घुसखोरी आम्ही कदापि सहन करणार नाही'

ऊस, द्राक्षशेतीकडे वाढता कल

तालुक्यात ९ हजार ५०० हेक्टर द्राक्ष, तर १० हजार हेक्टर ऊस आहे. याशिवाय शेतकरी २०० हेक्टरवर आंबा पिकवत आहेत. फिरलेले पाणी, कमी श्रम यामुळे शेतकरी ऊसशेतीकडे वळला आहे. द्राक्ष शेतीतून हेक्टरी सरासरी १० लाख, तर ऊस शेतीतून सरासरी साडेतीन लाखांची उलाढाल होते. यावरून होणाऱ्या उलाढालीचा अंदाज येतो.

Tasgaon Farmers Grape Pomegranate Crops Foreign Currency
Pankaja Munde : मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी 'ही' समितीचं जबाबदार; पंकजा मुंडेंचा थेट आरोप

हजारो हातांना मिळाला रोजगार

तालुक्यातील वाढत्या द्राक्षशेतीच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी लागणाऱ्या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या वाढू लागल्या आहेत. तालुक्यात दहा मोठ्या, तर चार छोट्या कंपन्यांची उलाढाल २५० कोटींवर पोहोचली आहे. अवजारे, ट्रॅक्टर, द्राक्ष आणि बेदाणा निर्मितीसाठी लागणारे पूरक साहित्य यांचा मोठा व्यवसाय उभा राहिला आहे. गावोगावी असलेली कृषी सेवा केंद्रे, बेदाणा शीतगृहांची साखळी यामुळे प्रचंड आर्थिक उलाढालीसह हजारो हातांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.