Municipal Election : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार अलर्ट; राष्ट्रवादी 'बॅकफूट'वर

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली कामे रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली आहे.
Tasgaon Municipal Election MP Sanjay Patil
Tasgaon Municipal Election MP Sanjay Patilesakal
Updated on
Summary

पालिका आणि प्रशासनावर भाजपचा वरचष्मा आजही कायम आहे.

तासगाव : आगामी पालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर खासदार अलर्ट मोडवर आले असून, पालिकेत गेली दीड वर्षे प्रशासकराज असूनही भाजपची पकड कायम ठेवण्यात खासदारांना यश मिळाले आहे. त्याची चुणुक आढावा बैठकीत पाहायला मिळाली. मात्र यामुळे राष्ट्रवादीमध्ये (NCP) अस्वस्थता वाढताना दिसत आहे.

साडेसहा वर्षांपूर्वी तासगावकर नागरिकांनी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्याकडे एकहाती सत्ता दिली होती. डिसेंबर २०२१ मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपला. गेली दीड वर्षे पालिकेवर प्रशासकराज सुरू आहे. मात्र सत्ता संपली आणि प्रशासकराज आले असले तरी पालिका आणि प्रशासनावर भाजपचा वरचष्मा आजही कायम आहे.

Tasgaon Municipal Election MP Sanjay Patil
Water Shortage : रत्नागिरीत भीषण पाणीटंचाई; 60 गावांतील 117 वाड्यांना टँकरने पाणी, 23 हजार लोकांना फटका

खासदार संजय पाटील यांनी नुकतीच घेतलेली आढावा बैठक असो वा चिल्ड्रन्स पार्क, खाऊ गल्लीच्या कामाचे भूमिपूजन, यातून खासदार पाटील यांनी पालिकेवर आजही पकड असल्याचे दाखवून दिले आहे; किंबहुना प्रशासनही अनेकदा कामे निश्चिती करणे अथवा कामात अडचणी आल्यास भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेताना दिसत आहे. दुसरीकडे, शहरात होणाऱ्या विकासकामांचे वाटप असो वा कामांचे भूमिपूजन, भाजपचे माजी पदाधिकारी अजूनही पालिकेत आपणच मालक असल्याच्या आविर्भावात वावरत असल्याचे चित्र आहे.

Tasgaon Municipal Election MP Sanjay Patil
Karnataka Election : विधानसभेत दिसणार 'पाटीलकी'; निवडणुकीत तब्बल 'इतक्या' पाटलांनी मिळवला विजय

नुकत्याच मंजूर झालेल्या कामांचे ठेकेदारांमध्ये वाटपही या माजी पदाधिकाऱ्यांनीच एका ठिकाणी बसून केले. एकूणच, प्रशासनकाळात पालिकेत राजकीय प्रभाव कमी होण्याऐवजी वाढताना दिसतो आहे, हे वास्तव अमान्य करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढत आहे. प्रशासक असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या पालिकेतील वाढत्या हस्तक्षेपाबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Tasgaon Municipal Election MP Sanjay Patil
Sahyadri Tiger Reserve : वन परिक्षेत्र पुनर्रचनेचा 'या' गावांना बसणार मोठा फटका; जाणून घ्या कारण

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेली कामे रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ‘बॅकफूट’वर गेली आहे, त्यातून कार्यकर्ते अद्याप सावरलेले नाहीत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात एकहाती नेतृत्व नाही. पालिकेतील माजी पदाधिकारी फिरकत नाहीत. निवडणूक तोंडावर असताना अद्याप दिशा ठरलेली अथवा ठरविण्यात आलेली नाही. भाजपचे अनुभवी पदाधिकारी ज्याप्रमाणे धावपळ करताना दिसत आहेत, तशी यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.