कवठेमहांकाळ : तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भरत विश्वनाथ कांबळे (वय ४८, ता. मिरज) असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. याबाबत संबंधित विद्यार्थिनीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली असून, शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.