निपाणी : विधान परिषद निवडणुकीसाठी निपाणी तालुक्यात निवडणूक विभागाकडून ९६ मुख्य व सहाय्यक निवडणूक अधिकारयांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या रविवारी (ता. ५) अधिकारयांना मतदान व निवडणूक कामकाजाविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तालुक्यात विधान परिषदेसाठी २८ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रीया चालणार आहे.विधान परिषद निवडणुकीच्या तयारीत येथील प्रशासन व्यस्त असून मतदान जवळ आल्याने तयारीने वेग घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था गटातील या निवडणुकीसाठी भाजपकडून महांतेश कवटगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी तर अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी रिंगणात आहेत. जवळपास बेळगाव जिल्हा कार्यक्षेत्र असणारया या निवडणुकीकडे निपाणी तालुक्याचेही डोळे लागून आहेत. ग्राम पंचायत सदस्य, नगरसेवक मतदानासाठी पात्र आहेत.
निपाणी तालुक्यात ५३४ मतदार आहेत. त्यात ग्राम पंचायत सदस्य, निपाणीचे नगरसेवक पदाधिकारयांचा समावेश आहे. १० डिसेंबरला ज्या-त्या ग्राम पंचायतीत मतदानाची प्रक्रीया चालणार आहे. तालुक्यात २७ ग्राम पंचायतीत तर निपाणीत नगरपालिकेत मतदान केंद्र असणार आहे. त्यासाठी ९६ अधिकारयांची नियुक्ती केली आहे. त्यात १२ अधिकारी अतिरीक्त आहेत. एका मतदान केंद्रासाठी ३ अधिकारी व पोलिस कर्मचारी असेल. यापूर्वी तहसीलदार डाॅ. मोहन भस्मे यांनी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुरक्षितता व सुविधांची पाहणी केली आहे.
बोरगावसाठी अधिकारी नियुक्त
विधान परिषदेनंतर तालुक्यात २७ डिसेंबरला बोरगाव नगर पंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठीही अधिकारयांची नियुक्ती केली असल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकारयांनी सांगितले.
तालुक्यात २८ मतदान केंद्रावर मतदान चालेल. प्रशासनाकडून तयारी पूर्णत्वास आली आहे. निवडणूक, सहाय्यक निवडणूक अधिकारयांची नियुक्ती झाली आहे. रविवारी (ता. ४) अधिकारयांना केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-डाॅ. मोहन भस्मे,तहसीलदार, निपाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.