K Chandrasekhar Rao : पंढरपूरनंतर गुलाबी वादळ सांगलीत धडकणार; KCR 'या' दिवशी येणार वाळवा दौऱ्यावर

वाटेगावात के. चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत भव्य अभिवादन सभा होणार आहे.
Telangana CM K Chandrasekhar Rao
Telangana CM K Chandrasekhar Raoesakal
Updated on
Summary

'तेलंगणाच्या मुख्यमंत्री महोदयांना अण्णाभाऊ साठेंचं महत्त्व वाटलं आणि त्यांनी अण्णाभाऊंबद्दल जाणून घेतलं.'

Nerle News : वाळवा तालुक्यामधील वाटेगाव येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीच्या निमित्ताने तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बी.आर.एस.) के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) हे अण्णाभाऊंच्या जन्म गावी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सचिन साठे यांनी दिली.

Telangana CM K Chandrasekhar Rao
Kolhapur Gold Biscuits : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नातू व मानवहित पक्षाचे प्रमुख सचिन साठे 'सकाळशी' बोलत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अण्णा भाऊ साठे जयंती समितीच्या सदस्यांनी के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली.

के. चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत भव्य अभिवादन सभा होणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने "पावणं जेवला काय? फेम गायिका राधाताई खुडे यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गणेश भगत, माजी समाजकल्याण सभापती अॅड. टी. एन. कांबळे, प्रदेश अध्यक्ष राधाकृष्ण साठे, संजय देशमुख, मिलिंद वाघमारे यांची उपस्थिती होती.

Telangana CM K Chandrasekhar Rao
Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

सचिन साठे म्हणाले, "आपल्या राज्यामध्ये कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अण्णाभाऊंना महत्त्व द्यावं असं वाटत नाही. म्हणून १९६० पासून राज्यातला एकही मुख्यमंत्री वाटेगावच्या दिशेने अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी येताना दिसले नाहीत. तेलंगणाच्या मुख्यमंत्री महोदयांना अण्णाभाऊ साठेंचं महत्त्व वाटलं आणि त्यांनी अण्णाभाऊंबद्दल जाणून घेतलं.

दीड दिवसांच्या शिक्षणानं इतकी प्रचंड मोठी साहित्यसंपदा अण्णा भाऊ कशी निर्माण करू शकतात. म्हणून एवढ्या महान व्यक्तीच्या गावी मला जावंच लागेल या भावनेनं ते वाटेगावच्या दिशेनं येत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी गणेश भगत, शंकर धोंडगे, भगिरथ भालके, देवराज पाटील, रवींद्र बर्डे, सरपंच नंदा चौगुले, सुरेश साठे, राहुल चव्हाण, राहुल पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.