बेळगाव : कमल बस्ती हे दहाव्या शतकातील जैन मंदिर आहे. जे रट्ट राजवंशाच्या कारकिर्दीत बांधले गेले. या मंदिराची निर्मिती इ. स. १२०४ मध्ये कार्तवीर्य चतुर्थ मंत्री बिच्चाराजा यांनी केली होती. दोनशे वर्षांपूर्वी जंगलामध्ये भगवान नेमिनाथची मूर्ती आढळली. चिक्की बस्तीसह बेळगाव किल्ल्याच्या आत हे मंदिर बांधले गेले होते.
आणि सध्याच्या काळात तेथे भग्नावशेष आहेत. कमल बस्ती हे नाव ७२ पाकळ्या असलेले मंदिर यावरुन पडले. ते ‘कमळा’सारखे दिसते. त्यावरुन मंदिराचे नाव ‘कमल बस्ती’ झाले. प्रत्येक पाकळ्यामध्ये प्रत्येक कालावधीसाठी २४ तीर्थंकरांच्या नावाचा समावेश आहे. हे मंदिर आज बेळगावची ओळख बनली आहे. हे मंदिर चालुक्य शैलीच्या वास्तूचे प्रतिनिधित्व करते.
बसवाण गल्लीतील सुबक मंदिर
कमल बस्तीनंतर बसवाण गल्लीतील भगवान श्री १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिराला मोठा इतिहास आहे. या मंदिरात असलेली मूर्ती ही ‘कमल बस्ती’ येथील आहे. तसेच काही वर्षांपूर्वी ५२ खेड्यातील लोक या ठिकाणी येऊन विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करत होते. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. तसेच या ठिकाणी पुरातन मूर्ती असून मंदिरात महावीर जयंती, नेमिनाथ जयंती, अक्षयतृतीया, मोक्षकल्याण महोत्सव आदी कार्यक्रम आयोजित केले जातात.
शंभर वर्षांपूर्वीचे चंद्रप्रभ मंदिर
शेरी गल्लीतील चंद्रप्रभ जैन मंदिराला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या मंदिरात महावीर जयंती दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच दीपोत्सव, श्रावण महिन्यात अलंकार पूजेसह वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मठ गल्लीतील चिक्क बस्ती
मठ गल्लीतील १००८ श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन चिक्क बस्तीला ११३ वर्षांचा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला आहे. तसेच श्रावण महिन्यात चातुर्मास, दशलक्ष पर्व, दसऱ्यामध्ये नवरात्री यासह महावीर जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
कोरे गल्लीत दोन मंदिरे
कोरे गल्लीत जैन समाजाची दोन मंदिरे आहेत. यापैकी पार्श्वनाथ दिगंबर पंचम जैन (जुने) मंदिराला मोठी परंपरा आहे. येथील मूर्ती १ हजार वर्षांपूर्वीची असून ४५० वर्षांपूर्वी मंदिर बांधण्यात आले होते. या ठिकाणी चातुर्मास, गुढी पाडवा, नवरात्रीवेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
दिगंबरांची ३७ श्वेतांबरांची ४ मंदिरे
शहरात एकूण ३७ जैन मंदिर आहेत. यामध्ये दिगंबर जैन मंदिराची संख्या अधिक प्रमाणात आहे. तसेच शेट्टी गल्लीतील पद्मावती मंदिरही प्रसिद्ध आहे. शहरात ४ श्वेतांबर जैन मंदिरेही आहेत. यापैकी पांगुळ गल्लीतील मंदिर सर्वात मोठे आहे. एसपीएम रोड, नानावाडी व सदाशिवनगर या भागात देखील श्वेतांबर जैन मंदिरे आहेत.
बेळगाव शहरात विविध धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. यामध्ये जैन धर्मियांची संख्याही मोठी आहे. जैन धर्मीयांची शहरात लहान-मोठी अशी ३७ मंदिरे आहेत. यापैकी अनेक मंदिरांना मोठा इतिहास असून कमल बस्ती शहरातील सर्वात जुनी बस्ती आहे. तर कोरे गल्ली, बसवाण गल्लीतील जैन मंदिरांना देखील ५०० वर्षांचा इतिहास आहे. उद्या (ता. १४) साजरा होणाऱ्या महावीर जयंतीनिमित्ताने शहरातील प्रमुख मंदिराचा घेण्यात आलेला आढावा पुढीलप्रमाणे.
- मिलिंद देसाई
शहरातील अनेक जैन मंदिरांना मोठा इतिहास आहे. मठ गल्लीतील मंदिराचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
- अजित पाटील, अध्यक्ष, कोरे गल्ली, जैन मंदिर
मठ गल्लीतील जैन मंदिर ११३ वर्षांपूर्वी बांधले. या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी नवग्रह मंदिर निर्माण करण्यात आले आहे.
-अप्पासाहेब चौगुले, विश्वस्त, मठ गल्ली, जैन मंदिर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.