Kolhapur Flood : 'आलमट्टीबरोबरच हिप्परगेही कोल्हापूर, सांगली महापुरासाठी कारणीभूत'; पूर परिषदेत 'हे' दहा ठराव मंजूर

कोयनेपासून अलमट्टीपर्यंतच्या नदीपात्रातील अनधिकृतपणे केलेल्‍या बांधकामांवर कारवाई करावी.
Narsinhwadi Flood Council
Narsinhwadi Flood Councilesakal
Updated on
Summary

कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांची पाणी पातळी, त्यामध्ये पडलेला पाऊस व सर्व धरणांतील पाणीसाठा त्यांची एकत्रित माहिती तत्काळ शासनाने पूर काळात पूरग्रस्तांना कळवावी.

नृसिंहवाडी : महापूर टाळण्यासाठीची महाराष्ट्र पूरनियंत्रण समिती (Maharashtra Flood Control Committee) अद्याप नाही, हे खेदजनक आहे, असा सूर येथे पूर परिषदेत व्यक्त झाला. यावेळी विविध दहा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण समिती व स्पंदन प्रतिष्ठानतर्फे तिसरी पूर परिषद येथील विठ्ठल मंदिर परिसरात झाली.

अध्यक्षस्थानी जलअभ्यासक विजयकुमार दिवाण होते. पाटबंधारे विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एम. के. कुलकर्णी प्रमुख पाहुणे होते. कुलकर्णी म्हणाले, ‘जून-जुलैमध्ये केंद्रीय जल परिचलनानुसार कोयना ते अलमट्टी मार्गावरील कोणत्या धरणात किती पाणी ठेवावे, किती पाण्याचे विसर्ग करावा, या जल परिचलनानुसार पूर्णपणे अंमलबजावणी केल्यास पुराचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.’

Narsinhwadi Flood Council
Shaktipeeth Highway : कोणत्याही परिस्थितीत 'शक्तिपीठ' महामार्ग रद्द करणारच; हसन मुश्रीफांचं मोठं विधान

दिवाण म्हणाले, ‘अलमट्टी धरणाबरोबर (Almatti Dam) हिप्परगे बॅरेजही (बंधारा) महापुरासाठी कारणीभूत आहे. यासाठी कोल्हापूर बंधाऱ्याच्या धर्तीवर हिप्परगी धरणाचे दरवाजे तळातून काढावेत व नवीन अद्ययावत पद्धतीने ते तयार करावेत.’ या परिषदेत मांडलेल्या ठरावांना दीपक पाटील व राकेश जगदाळे यांनी अनुमोदन दिले. प्रदीप वायचळ, दत्ता उथळे, सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रा. बाळ संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्यजित सोमण, दत्तात्रय जगदाळे, महेश जाधव, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, द्वारकानाथ जाधव, दादा गवळी, दीपक कबाडे, जितेंद्र चौगुले, आशाराणी पाटील, एकनाथ माने, बशीर फकीर, महावीर कुंभोजे, जयपाल उगारे, हेमंत बाहुलेकर, आण्णासो आणुजे, बाळासो रजपूत यांच्यासह अनेक कार्यकर्ते पूर परिषदेत उपस्थित होते. आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Narsinhwadi Flood Council
आलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक, जीवितहानी होणार नाही पण..; काय म्हणाले मुश्रीफ?

परिषदेतील ठराव

  • केंद्रीय जलआयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांत महापुराच्या पार्श्वभूमीवर समन्वय ठेवावा

  • कृष्णा खोऱ्यासह अन्य खोऱ्यांतील पाण्याचे परिचलन महापुराच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक पद्धतीने नियोजनबद्ध करावे

  • पूर काळामध्ये सांगली-जिल्ह्यातील टेंभू-ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवावे

  • कोयनेपासून अलमट्टीपर्यंतच्या नदीपात्रातील अनधिकृतपणे केलेल्‍या बांधकामांवर कारवाई करावी

  • कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांची पाणी पातळी, त्यामध्ये पडलेला पाऊस व सर्व धरणांतील पाणीसाठा त्यांची एकत्रित माहिती तत्काळ शासनाने पूर काळात पूरग्रस्तांना कळवावी

  • जिल्ह्यामध्ये जलवैज्ञानिक अधिकाऱ्याची नेमणूक करावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.