शिक्षकांसाठी मार्चमध्ये टीईटी...

TET in March for Teachers belgum maratyhi news
TET in March for Teachers belgum maratyhi news
Updated on

बेळगाव - शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा टीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा १५ मार्च रोजी संपूर्ण राज्यात पार पडणार आहे. शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्‍त असूनही टीईटी व सीईटीत गुणवत्ता मिळविणाऱ्या परीक्षार्थींची संख्या कमी असल्याने शिक्षक भरतीत अडचणी येत आहेत. त्यामुळे यावेळी टीईटीच्या निकालात वाढ होणे आवश्‍यक आहे.

शिक्षण खात्याकडून अधिसूचना; कमी निकालामुळे परीक्षा वारंवार घेण्याची वेळ

शिक्षण खात्याने शुक्रवारी टीईटीबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार शनिवारपासून टीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरवात करण्यात आली आहे. परीक्षार्थी २५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. टीईटीत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना सीईटी द्यावी लागणार आहे. तसेच टीईटीत उत्तीर्ण झालेले डीएड व बीएडधारक सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिकविण्यास पात्र ठरणार आहेत.

राज्यात २०१४ पासून शिक्षक भरतीसाठी टीईटी घेण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी टीईटीचा निकाल अत्यल्प लागत आहे. गेल्यावर्षी निकाल अतिशय कमी लागल्याने सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुरळक होती. तसेच सीईटीत उत्तीर्ण झालेले शिक्षक शिक्षकभरतीसाठी पात्र ठरु शकले नाहीत. त्यामुळे, अनेक शैक्षणिक जिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्‍त राहिल्या. जागा मंजूर होऊन सर्व जागांवर शिक्षक भरती होऊ शकलेली नाही. शिक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार टीईटी निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात शिक्षकांच्या किती जागा भराव्यात याबाबत निर्णय घेण्यात येणार असून शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच शिक्षक भरती व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

शिक्षक भरती लवकर व्हावी यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण खात्याने टीईटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. डीएड व बीएडधारकांनी त्यानुसार अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे.
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.