शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती

शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती
Updated on
Summary

मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आधुनिकतेचा मार्ग स्वीकारणाऱ्या तरुण शेतकऱ्यांसाठी हे ॲप फायद्याचे ठरत आहे.

सांगली : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शाश्वत उत्पन्न मिळवायचे आहेना, मग शेतकरी बांधवांनो, मोबाईलमध्ये ‘कृषीक शेतकरी...आधुनिक शेतकरी ‘ॲप असायलाच हवे. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या संयुक्त विद्यमाने या ॲपची निर्मिती केली आहे. हे ॲप डाऊनलोड करून घ्या आणि एका क्‍लिकवर मिळवा. हवामान अंदाज, कृषी व पशुसल्ला, शेतीविषयक बातम्या, शेतमालाचे बाजारभाव, कृषितज्ज्ञांचे मार्गदर्शन, पिकांची सुधारित लागवड पद्धती आणि त्याचबरोबर शेतीविषयक सर्व उपयुक्त माहिती. विशेष म्हणजे कृषी विद्यापीठांचे परिसंवाद आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे भावही उपलब्ध आहेत. (The agricultural app has been created for the modern perfect farming of agriculture)

शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार! ‘सिव्हिल’मधूनच इंजेक्शन गायब

मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आधुनिकतेचा मार्ग स्वीकारणाऱ्या तरुण शेतकऱ्यांसाठी हे ॲप फायद्याचे ठरत आहे. ॲपमध्ये गावनिहाय हवामान अंदाज त्याचबरोबरच हवामानावर आधारित हंगामनिहाय खरीप, रब्बी, उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिके याबद्दल कृषीसल्ला उपलब्ध आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन याबाबत सल्लादेखील ॲपमध्ये असल्याने शेतकऱ्यांना फायद्याचा ठरत आहे.

शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती
सांगलीतील ३३ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीत

डाऊनलोड करा कृषीक ॲप

आपल्या अँड्रॉईड मोबाइल फोनमधील गूगल प्ले-स्टोअर मध्ये सर्च करून अथवा क्युआर कोड स्कॅन करून प्रथम कृषी ॲप डाऊनलोड करावे. ॲप ओपन करताना त्यात प्रथम आपला मोबाईल नंबर टाकावा. नंतर त्यात आपला जिल्हा, तालुका, गाव व आपले नाव प्राथमिक माहिती भरा. पुढे जाऊन यामधील सर्व नियम व मधील सर्व नियम व व अटी मान्य करा. त्यानंतर आपणास ओटीपी येईल तो टाकून पुढे जा. आता स्क्रीन वर येणाऱ्या सर्व बटणावर क्लिक करा. आता हे ॲप आपण वापरू शकता.

एनपीके... खत शिफारस

प्रथम एनपीके गणकयंत्रावर पुढे येणाऱ्या विंडोमध्ये कृषी विद्यापीठाच्या पीकनिहाय शिफारशीत खतमात्रा भरू शकता. सध्या फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या कार्यकर्त्यांनी शिफारशींची पिकासाठी पात्रांचा समावेश समावेश केला आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील ठिबकद्वारे खते पात्रांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी मित्रांनो वरील प्रमाणे आपण पूर्ण केंद्रांच्या माध्यमातून संबंधित कृषी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठी करण्यासाठी वापर करावा.

शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती
कोल्हापूर, सांगली महावितरणच्या 500 कर्मचार्‍यांचा सेवाभाव

ॲप-खत गणकयंत्रातील वैशिष्ट्ये

- सबंधित कृषी विद्यापीठाच्या पिकनिहाय खत शिफारशींचा समावेश

- जमीन आरोग्य आधारित विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा

- बाजारातील किमतीनुसार प्रति एकर आवश्‍यक खतमात्रांच्या खर्चाची गणना

- शिफारस केलेल्या खतमात्रा एनपीके वापरासाठी विविध खतांचे पर्याय

- सरळ संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय उपलब्ध

- गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना

मराठी भाषेत माहिती

हवामानात सातत्याने होणारा बदल पिकांच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या शेतकऱ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागते. या बदलांची पूर्वकल्पना देता आल्यास त्यांना पिकांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करता येऊ शकेल, याच हेतूने मराठी भाषेत तयार केलेले "कृषिक' ॲप शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

(The agricultural app has been created for the modern perfect farming of agriculture)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.