कोविडमुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ESIC कडून पेन्शन

कोविडमुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ESIC कडून पेन्शन
Updated on
Summary

ही योजना दोन वर्षांसाठी लागू राहणार आहे. यासाठी हा कामगार कोरोनाचे निदान झालेल्या दिवसाआधी तीन महिने ईएसआयसीकडे नोंदणीकृत असावा.

सांगली : कोरोना (Corona) महामारीतून सावरण्यासाठी ईएसआयसीने(ESIC) कामगारांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईएसआयसीकडे नोंदणीकृत असणारा कामगार (Workers) जर कोरोनामुळे मृत्युमुखी (Died) पडला तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना अवलंबित्व लाभ हा पेन्शन स्वरुपात मिळणार आहे, अशी माहिती पुणे विभागाचे प्रभारी उपनिदेशक हेमंतकुमार पांडे यांनी दिली. (The families of the workers who died due to covid will get a pension from ESIC)

कोविडमुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ESIC कडून पेन्शन
सांगली परीसरात बिबट्याची एंट्री; वनविभागाचे सतर्कतेचे अवाहन

ईएसआयसीने नोंदणीकृत कामगारांसाठी सुरू केलेली ही योजना २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. ती २३ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल. म्हणजे ही योजना दोन वर्षांसाठी लागू राहणार आहे. यासाठी हा कामगार कोरोनाचे निदान झालेल्या दिवसाआधी तीन महिने ईएसआयसीकडे नोंदणीकृत असावा. तसेच निदान झाल्यावेळी तो नोकरीवर असावा व त्याने कोविड पॉझिटीव्ह रिपोर्टच्या एक वर्ष अगोदर ७० दिवसांचे अंशदान भरलेले असावे. कोरोनाला बळी पडलेल्या विमीत कामगाराच्या पात्र कुटुंबीयांना या योजनेचा फायदा मिळेल.

कोविडमुळे मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ESIC कडून पेन्शन
सांगली : पलूसच्या मंडल अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

पात्र कामगारांच्या कुटुंबीयांना सीआरएस-१ हा अर्ज मृत्यू प्रमाणपत्र व कोविड पॉझिटिव्ह रिपोर्टसहित आपल्या ईएसआयसी शाखेमध्ये जमा करावा, असे आवाहन श्री. पांडे यांनी केले. अधिकची माहिती ईएसआयसीच्या संकेतस्थळावर मिळेल. (The families of the workers who died due to covid will get a pension from ESIC)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.