नगरविकास खात्याने पालिका प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.
निपाणी (बेळगाव): घरफाळा सवलतीत ५ टक्के सूटची सवलत ऑगस्टअखेर बंद झाली आहे. परिणामी मालमत्ताधारकांना सप्टेंबर अखेर १०० टक्के फाळा भरावा लागेल आणि ऑक्टोबरनंतर फाळ्यावर २ टक्के दंड भरावा लागणार आहे. नगरविकास खात्याने पालिका प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.
गतवर्षी व यंदा कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे पालिकेचा महसूल वसुलीच्या दृष्टीने अर्थकारण विस्कळीत बनले आहे. कारण ऐन आर्थिक वर्ष अखेरीला लॉकडाउन जारी होत असल्याने पालिकेत घरफाळा वसुली करताना अडथळे येत आहेत. पालिका दरवर्षी घरफाळा वसुलीसाठी २ कोटी ७५ लाखाचे उद्दीष्ट ठेवते. यंदा मात्र उद्दीष्ट वाढवून ३ कोटीवर नेले आहे. उद्दीष्ट वाढले मात्र वसुलीवेळी कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे एप्रिलनंतर फाळा भरण्याकडे मालमत्ताधरकांनी पाठ फिरवली. दरवर्षी मार्चनंतर एप्रिल महिन्यात खात्याकडून फाळ्यावर ५ टक्के सूट दिली जाते. मात्र गतवर्षी व यंदा कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे शासनाने ५ टक्के सूट सवलतीत मुदतवाढ दिली आहे.
एका एप्रिल महिन्यापुरती असणाऱ्या सवलतीत तब्बल पाच महिन्यांनी वाढ करण्यात आली. परिणामी फाळा भरताना असंख्य मालमत्ताधारकांना सवलतीचा लाभ झाला. आत्तापर्यंत पालिकेने जवळपास दीड कोटी रुपयांचा फाळा वसुलीचा टप्पा गाठला आहे. चालू सप्टेंबर महिन्यात ५ टक्के सूट सवलत बंद झाली आहे. ऑक्टोबरनंतर फाळ्यावर २ टक्के दंड भरावा लागणार आहे. घरफाळा हे पालिका उत्पन्नाचे महत्वाचे स्त्रोत्र आहे. त्यामुळे पालिकेतील महसूल विभाग घरफाळ्यासह गाळे भाडे वसुलीवर अधिक लक्ष ठेवून असते. मात्र कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे प्रशासनालाही फाळा वसुली करताना मालमत्ताधारकांकडे मागे लागता आले नाही. पालिकेने ३ कोटीचे उद्दीष्ट ठेवले असून निर्धारीत वेळेत ते गाठणे शक्य असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
५ टक्के सूट सवलत ऑगस्टअखेर संपली आहे. आता सप्टेंबर महिन्यात १०० टक्के फाळा भरावा लागेल. ऑक्टोबरनंतर फाळ्यावर २ टक्के दंड भरावा लागणार आहे. मालमत्ताधरकांनी फाळा भरून प्रशासनाला सहकार्य करावे.
- जगदीश हुलगेज्जी, आयुक्त, निपाणी नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.