Loksabha Elections : 'या' चार लोकसभा मतदारसंघांत आमचाच विजय होणार; जयंत पाटलांचा मोठा दावा

जयंत पाटील यांनी मेळाव्यामध्ये सरकारवर सडकून टीका केली.
Jayant Patil Loksabha Elections
Jayant Patil Loksabha Electionsesakal
Updated on
Summary

एक आमदार ‘मंत्र्यांच्या पेकाटात लाथ घाला,’ म्हणतो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. हे फार गंभीर आहे.

सांगली : सातारा, माढा, शिरूर, नगर या चार मतदारसंघांत आमचात विजय होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. विजय निश्चय मेळावा घेत असतानाच प्रदेशाध्यक्षांनी या वेळी बूथ कमिट्यांचाही आढावा घेतला. तसेच बूथ कमिट्या पूर्ण करण्याचे आव्हानही पदाधिकाऱ्यांना दिले.

पक्षातर्फे आयोजित केलेल्या विजय निश्चय दौऱ्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेला दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. ५ तारखेपासून सुरू झालेला दौरा तब्बल ८ तारखेपर्यंत चालला. दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल ४ लोकसभा (Loksabha Elections) मतदारसंघांत विजय निश्चय मेळावे घेतले.

जयंत पाटील यांनी मेळाव्यामध्ये सरकारवर सडकून टीका केली. या सरकारच्या राज्यात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे, तसेच गरीब जनता पिचली जात आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. आज राज्यात काही रामराज्य राहिले नाही. आमदार पोलिस ठाण्यात गोळीबार करतो. एक आमदार ‘मंत्र्यांच्या पेकाटात लाथ घाला,’ म्हणतो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. हे फार गंभीर आहे.

Jayant Patil Loksabha Elections
बहुजन समाजातील माणसाचं भलं करण्यासाठी राजकारण करणारी आम्ही मंडळी आहोत - अजित पवार

मंत्रिपदावर असणाऱ्या माणसाबद्दल असे बोलले जात असेल, तर परिस्थिती काय आहे, हे आपल्या लक्षात येईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले गेले. दोन मराठी माणसांनी प्रचंड मेहनत घेऊन हे पक्ष उभे केले होते. मराठी माणसाचे पक्ष फोडले गेले आणि सत्ता हस्तगत केली गेली. ७० वर्षांत ५६ लाख कोटी रुपयांचे कर्ज देशावर होते. आता मागच्या १० वर्षांत २०० लाख कोटींहून अधिक कर्ज झाले आहे, असे सांगत असतानाच ही निवडणूक गोरे विरुद्ध देशमुख नसेल.

Jayant Patil Loksabha Elections
मोठी बातमी! शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? 'महाविकास आघाडी'कडून तिकीट मिळण्याची शक्यता

आपला देश वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे. याचे भान आपण ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अशोक पवार, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यासह सातारा, सोलापूर, नगर, पुणे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()