Sangli News : 'अवकाळी'च्या तडाख्याने द्राक्ष बागा उद्ध्वस्त, शाळू भुईसपाट; सांगलीत हजारो एकर क्षेत्र बाधित

चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जिल्ह्यातील सर्वच पिकांना फटका बसला आहे.
Unseasonal Rains Sangli
Unseasonal Rains Sangliesakal
Updated on
Summary

तासगाव, मणेराजुरी, अंजनी, सावळज, विसापूर परिसरात झालेल्या पावसाच्या पाण्याने द्राक्ष बागा तुडुंब भरल्या आहेत.

सांगली : दिवाळीपूर्वी आणि आता चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जिल्ह्यातील सर्वच पिकांना फटका बसला आहे. तासगावात ऐन फुलोऱ्यातील द्राक्ष (Grapes) बागा झडून गेल्या, तर आगाप बागांवर रोगांचे संकट उभे राहिले आहे. तसेच द्राक्षमणी कुजण्याची चिंता निर्माण झाली आहे.

कवठेमहांकाळ परिसरातील शाळू पिके अक्षरश: झोपली आहेत. आटपाडीत तर हरभरा पीक उन्मळून पडले आहे. द्राक्ष बागांवर रोगराईची भीती असल्याने पलूसमध्ये सकाळपासूनच द्राक्ष बागायतदारांनी युद्धपातळीवर औषध फवारणी सुरू केली आहे. दुष्काळात जगवलेली पिके, बागा उद्ध्वस्त होत आहेत. शिवाय अतिपावसाने काही भागांत ऊसतोड ठप्प झाली आहे.

Unseasonal Rains Sangli
Suresh Khade : 'अवकाळी'चा सांगलीला तडाखा, 4 हजार हेक्टर शेतीक्षेत्र बाधित; मिरज, तासगाव, जतला मोठा फटका

हरभरा, गहू, शाळू पिकांना थोडासा लाभ

पलूस : पलूस शहरासह तालुक्याला गुरुवारी (ता. ३०) रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. चार ते पाच तासांत ६२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. पलूस, अंकलखोप, आमणापूर, सावंतपूर, कुंडल गावांना याचा फटका बसला आहे.

पलूस तालुक्यात या हंगामात अत्यल्प पाऊस पडला आहे. शेतीला व पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासत होती. विहिरी, कूपनलिकांना नाममात्र पाणी आहे. अपवाद वगळता पावसाळा कोरडाच गेला. मात्र, काल रात्री शहरासह अंकलखोप, आमणापूर, सावंतपूर, कुंडल आणि तालुक्यातील अन्य गावात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. रात्री आठपासून सुरू झालेला पाऊस आज पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होता. या वेळेत पलूस येथे ६२.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने ओढे, नाल्यांना पाणी आले आहे. अवकाळी पावसाने शेतीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.

Unseasonal Rains Sangli
Konkan News : मध्याश्मयुगीन काळातील कातळशिल्प 'राज्य संरक्षित स्मारक' म्हणून घोषित; शासनाकडून अधिसूचना जारी

फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्ष बागांमधील द्राक्ष मणी गळून पडणार आहेत, फळकुज होणार आहे. द्राक्ष बागेत डाऊनी, भुरी अन्य रोगांच्या प्रादुर्भावाची भीती आहे. त्यामुळे सकाळपासूनच द्राक्ष बागायतदारांनी युद्ध पातळीवर औषध फवारणी सुरू केली आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. मात्र पावसामुळे ऊस तोडणी व वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

तासगावात ५४५० हेक्टर द्राक्षबागा झाल्या बाधित

तासगाव : चार दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या पावसाने तालुक्यातील निम्म्या द्राक्ष बागांतील फुले गळून गेली आहेत. हा फटका ५०० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. सलग दुसऱ्या वर्षी असे संकट आल्याने द्राक्षशेतीच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

तासगाव तालुक्यात गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडला. तासगाव, मणेराजुरी, अंजनी, सावळज, विसापूर परिसरात झालेल्या पावसाच्या पाण्याने द्राक्ष बागा तुडुंब भरल्या आहेत. तालुक्यातील ९ हजार ७३१ हेक्टर द्राक्षक्षेत्रापैकी ३५ टक्के बागा फुलोऱ्यामध्ये आहेत. पावसाने फुले गळून गेली आहेत. याशिवाय छाटणी होऊन ८० ते ९० दिवस झालेल्या बागांमध्ये द्राक्ष मणी तडकणे सुरू झाले आहे. अशा बागांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. उर्वरित द्राक्षांना डाऊनी, भुरी यांसारख्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. प्राथमिक अंदाजानुसार ५ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील बागा अवकाळीने बाधित झाल्या आहेत.

Unseasonal Rains Sangli
कोकणात सापडली 40 हजार वर्षांपूर्वीची दगडी हत्यारे; शिकार, जनावरांचं मांस फाडण्यासाठी केला जात होता वापर

फुलोरा अवस्थेमधील ३५ ते ४० टक्के बागांचे नुकसान झाले आहे. याशिवाय मणी सेट झालेल्या बागांमध्ये फळकुज सुरू आहे. दुर्दैवाने यावर कोणतेही औषध परिणाम करत नाही.

-राजेंद्र हिंगमिरे संचालक, द्राक्ष बागायतदार संघ

ज्वारी, गहू, हरभऱ्यासह द्राक्ष, डाळिंबाला फटका

आटपाडी : अवकाळी पावसाने तीन दिवसांपासून तालुक्याला झोडपून काढले आहे. रब्बीतील ज्वारी, गहू आणि हरभरा पिकांसह द्राक्ष आणि डाळिंब बागांना देखील पावसाचा फटका बसला आहे. राजेवाडी, पुजारवाडी, निंबवडे भागातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आल्याने फळबागा आणि अन्य पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. पावसाळ्यात पावसाची दडी, परतीचा पाऊस जेमतेम, त्यावरच रब्बी ज्वारीच्या पेरणी केल्या. तर पंधरा दिवसांपूर्वी हरभरा आणि गव्हाची पेरणी झाली. रब्बी पिकांना कसलीही थंडी मिळाली नसल्याने आधीच संकटात असताना पुन्हा अवकाळी पाऊस पडल्‍याने पिकांना जबर फटका बसला आहे.

Unseasonal Rains Sangli
Chandoli Dam : 'चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याला विरोध का? मदनभाऊ आज हयात असते, तर त्यांनी..'

तीन दिवसांत आटपाडी, करगणी, दिघंची, झरे आणि खरसुंडी परिसरात शंभर मिलिमीटरवर पाऊस पडला आहे. पावसासह वादळी वारे होते. त्यामुळे आगाप रब्बी ज्वारी भुईसपाट झाली आहे. नुकताच पेरणी केलेला गहू आणि हरभऱ्याची जमीन सलग पावसामुळे कठीण होणार आहे. त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होईल. पावसामुळे हरभरा पिके उन्मळून पडली आहेत. रब्बी पिकांना थंडीची आवश्यकता असते. मात्र ती नसल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम पिकावर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.