महिषासुरमर्दिनीची दुसरी मूर्ती प्राचीन काळातील आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. तलवार, त्रिशूल पाहण्यासारखे आहे.
नेर्ले : वाळवा तालुक्यातील येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात (Bhairavnath Jogeshwari Temple) शिव-पार्वती मूर्ती (Shiva-Parvati idol) आहेत. संशोधनातून या मूर्ती एक हजारांहून अधिक वर्षांपूर्वीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूर्तीची पूजा येथेच होतेय. प्राचीनत्व व शिवमूर्ती पूजा हा नेर्लेकरांच्या दृष्टीने अमूल्य ठेवा ठरला आहे. इतिहास संशोधक संजय पाटील व विक्रम पाटील यांनी संशोधन केले.