बेळगावहून निपाणीच्या दिशेने उताराला अवजड वाहतुकीच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनांना जोराची धडक दिली.
निपाणी : राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore Highway) बेळगाव ते कोल्हापूरदरम्यान निपाणीजवळ असलेल्या तवंदी घाटात (Tavandi Ghat) ट्रकने आठ वाहनांना भीषण धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार, तर दहांहून अधिक जण जखमी झाले. रविवारी संध्याकाळी सहा वाजता हा अपघात झाला. रात्री उशिरापर्यंत जखमींना विविध ठिकाणी दाखल केले होते. अपघाताचे दृश्य पाहून मृतांचा व जखमींचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.