दोघे दीड फुटांवर आले असता सारे संपले, अशी साऱ्यांची भावना झाली.
सांगली : आयर्विन पुलाजवळील (Irvine Bridge) माई घाट (Mai Ghat) परिसरातील कृष्णा नदीपात्रात (Krishna River) काल सकाळी एका थरारक प्रसंगाचे अनेक साक्षीदार झाले. मगरीच्या (Crocodile) रुपातील मृत्यूला चकवा देणाऱ्या या प्रसंगातील हिरो होते शरद राजदीप. दीड फुटांवर मगर आली तरी त्यांना पत्ताच नव्हता. मगरीने मार्ग बदलला अन् दूर निघून गेली.
शरद सांगलीचे वृद्ध जलतरणपटू. दिवंगत मारुती कांबळे यांचे नातू. नदीत पोहणे नित्याचे. एक ऑक्टोबरला कोल्हापूर येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आहेत. ५५ ते ६० वयोगटात सहभागी होणार आहेत. नेहमीप्रमाणे बायपास पुलाकडील पात्रात तिसऱ्या विहिरीपासून ते आयर्विन पुलाकडे पोहत येत होते.
कानात पाणी जाऊ नये, म्हणून ईअर प्लग घातले होते. सांगलीवाडीकडील घाटाजवळ आले असताना अचानक ‘आयर्विन’कडून येणारी मगर लोकांना दिसली. सारे नदीपात्राबाहेर आले. मात्र शरद पोहतच होते. मगर व ते समोरासमोर येत असताना बघ्यांनी सावध करण्याचा प्रयत्न केला.
काहींनी मोबाईल चित्रण सुरू केले. दोघे दीड फुटांवर आले असता सारे संपले, अशी साऱ्यांची भावना झाली. मगर अचानक गायब झाली. राजदीप पोहत पार झाले. ते काठावर आले. सर्वांनीच ‘उद्धार’ केला. जीव वाचला, या आनंदात त्यांनी सर्वांना नाश्ता दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.