Belgaum : सीमाभागात कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; महाराष्ट्रातील वाहनांची कडक तपासणी

कन्नड संघटनांकडून मराठी भाषिकांचा ‘काळा दिन’ होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Karnataka Government Karnataka Police Karnataka Rajyotsava
Karnataka Government Karnataka Police Karnataka Rajyotsavaesakal
Updated on
Summary

कन्नड संघटनांकडून मराठी भाषिकांचा ‘काळा दिन’ होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बेळगाव : काळा दिनी सीमाभागात 1 नोव्हेंबरला लोकशाही मार्गानं बंद पाळण्याची परंपरा आहे. मात्र, पोलिस प्रशासन दडपशाही करीत मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे.

कर्नाटक राज्योत्सव आणि भाषावार प्रांतरचनेत जबरदस्तीनं कर्नाटकात घुसडल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारविरोधात (Karnataka Government) मराठी भाषिकांकडून आज 1 नोव्हेंबरला पाळण्यात येणाऱ्या सुतक व काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात कानडी पोलिसांचा (Karnataka Police) फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे.

Karnataka Government Karnataka Police Karnataka Rajyotsava
'How's The Josh'! विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधींची पळण्याची 'शर्यत'; कार्यकर्त्यांत उत्साह वाढवणारा Video समोर

दरम्यान, काही कन्नड संघटनांकडून (Kannada Association) मराठी भाषिकांचा ‘काळा दिन’ होऊ न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागात वातावरण तणावपूर्ण असून मराठी भाषिकही एकवटले आहेत. प्रतिवर्षाप्रमाणं यंदाही मराठी भाषिक सीमालढा चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगाव इथं 1 नोव्हेंबरला सकाळी छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून मराठी भाषिक काळी वस्त्र परिधान करून, काळे झेंडे घेऊन मूक सायकल फेरी काढणार आहेत.

Karnataka Government Karnataka Police Karnataka Rajyotsava
HP Assembly Election : बंडखोरांवर भाजपची मोठी कारवाई; 5 नेत्यांना केलं निलंबित

शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघणारी ही फेरी मराठा रंगमंदिरात येऊन इथं सभा होणार आहे. सीमाभागात बेळगावसह इतर गावांतही मराठी भाषिकांकडून काळादिनी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, मराठी भाषिकांचा काळा दिन व कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर, तसेच चौकांमध्ये बंदोबस्तासाठी अडीच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. निपाणीतील कोगनोळी नाक्यावरही कानडी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.