Krishna River : कृष्णा नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी सांडपाणी मुक्त अभियान राबवायला हवे; अभियान राबविण्यासाठी हवे सक्तीचे धोरण!

वीज निर्मिती शक्य आहे. वीज, उर्जा निर्मितीचे प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने सक्तीची भुमिका घ्यायला हवी.
to prevent pollution of Krishna river sewage campaign should implemented policy to implement campaign
to prevent pollution of Krishna river sewage campaign should implemented policy to implement campaignsakal
Updated on

किल्लेमच्छिंद्रगड : कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अलीकडे खूपच गंभीर झाला आहे. एखादा आजार निर्माण व्हावा आणि त्यावर कोणतीच उपचार पद्धती नसावी अशी सध्या नदीच्या आरोग्याची अवस्था झाली आहे. नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आजचा नाही. तो सन १९६४ मध्ये कोयनाधरण बांधल्यानंतर १९६७ पासून रब्बी पिकासाठी कृष्णा नदीवर जलसिंचन योजना होत गेल्यानंतर अधिक गंभीर बनलाय.

गेल्या पन्नास वर्षात कृष्णाकाठी साखर कारखाने, दूध संघ, केमिकल फॅक्टऱ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या तसे कृष्णाच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले. आज मळीमिश्रीत, केमीकल मिश्रीत पाण्याने कृष्णेत मासे मरू लागले आहेत, उद्या कृष्णाकाठी माणसे मरतील याचा विचार करून नदीत मिसळणाऱ्या दुषीत पाण्याबबत तातडीने विचार होवून उपाय योजना करणे गरजेचे आहे.

गेल्या दहा वर्षात कृष्णा नदीच्या प्रदूषणाचे प्रमाण खुपच वाढले आहे. साखर कारखाने, दुध संघ, तेल उद्योग, केमिकल फॅक्टऱ्या यांनी आपल्या प्रदुषीत पाण्याची विल्हेवाट लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते विषारी पाणी कृष्णा नदीत सोडण्यापासून स्वःताला रोखू शकत नाहीत.

जरी रोखायचे म्हटले तरी ते पाणी सोडायचे कुठे हाही गंभीर प्रश्न कारखानदारासमोर उभा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कितीही कारवाया केल्या तरी कृष्णेत मिसळणारे दुषीत पाणी रोखणे त्यांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. कारण कोयना धरणापासून सांगलीपर्यतच्या मळी, रसायन, केमिकल मिश्रीत सांडपाण्याची सोय करायची म्हटले तर सांडपाण्याची एक स्वतंत्र नदी बारमाही वाहती राहील इतका प्रदूषीत पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

सांडपाणी, मळी (मोलॅसिस) वर प्रकिया करून

वीज निर्मिती शक्य आहे. वीज, उर्जा निर्मितीचे प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने सक्तीची भुमिका घ्यायला हवी. सांडपाणी, मळी (मोलॅसिस) वर प्रकिया करून वीज निर्मिती करणे शक्य आहे. तसेच अलिकडे बाजारात काही केमिकल्स उपलब्ध आहेत.

त्यांचा वापर केल्याने दुषीत पाणी सिंचनासाठी वापर करण्याइतपत स्वच्छ करणे शक्य आहे. कारखानदार, शासन आणि उद्योजकांच्या (सीएसआर) एकत्रीत निधीतून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करायला हवे तरच "कृष्णा' प्रमाणे राज्यातील इतरही नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. अन्यथा प्रदूषित पाणी वापराने मनुष्याला त्वचा विकार, कॅन्सर सारख्या व्याधीला कायम स्वरूपी सामोरे जावे लागेल.

हागणदारी मुक्त अभियानाप्रमाणे हवे सांडपाणी मुक्त अभियान..!

गाव असो वा शहरात राहणारे नागरीक. ते जे पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त जे पाणी वापरतात ते सर्व सांडपाणी असते. कऱ्हाड पासून सांगली पर्यंत जर प्रत्येक गावाबाहेर जावून पाहिले तर ते पाणी ओढ्याद्वारे नदीस जावून मिळते आणि शहराबाहेर जावून पाहिले तर ते थेट नदीत उतरते.

या सांडपाण्यात मानवी मल मुत्राचा, शहरातील लघु उद्योग, लाँड्री व्यवसायातील रासायनिक पाण्याचा समावेश असतो. नदीत मिसळणाऱ्या या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी घर तेथे शैचालय अभियानाप्रमाणे हवे घर तेथे शौष खड्डा अभियान. असे अभियान राबवीले गेले तर प्रत्येक घरातील सांडपाणी जमिनीत जिरविले गेल्याने पन्नास टक्के नद्याचे प्रदूषण कमी होईल. यासाठी मात्र सक्तीचे धोरण हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.