यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद

यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद
Updated on
Summary

प्रशासनाने अद्याप वाहतूक सेवा सुरू केलेली नाही. सायंकाळनंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला हाेईल, असे मंडल पाेलिस निरीक्षक शिवयाेगी संगमेश यांनी सांगितले.

निपाणी (बेळगाव): यमगर्णी वेदगंगा नदी परिसरातील पूर झपाट्याने ओसरू लागला आहे. परिणामी तब्बल चार दिवसांनंतर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरल्याने साेमवारी (ता‌. २६) पहाटे महामार्ग खुला झाला. मात्र प्रशासनाने अद्याप वाहतूक सेवा सुरू केलेली नाही. सायंकाळनंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला हाेईल, असे मंडल पाेलिस निरीक्षक शिवयाेगी संगमेश यांनी सांगितले.

यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद

अतिवृष्टीमुळे गुरुवारी (ता.२२) रात्री उशीरा यमगर्णी वेदगंगा नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्ग पाण्यात बुडाला हाेता. त्यानंतर पावसाचा जाेर वाढल्याने महामार्गावरील पाणी पातळीत झपाट्याने वाढ हाेत जाऊन ती आठ ते फूटांपर्यंत पाेचली हाेती. त्यामुळे वाहतूक बंद करून येथे कडक बंदाेबस्त ठेवला हाेता. वाहतूकीसाठी महामार्ग बंद झाल्याने महामार्गाच्या दाेन्ही बाजुला वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद
निपाणी, चिक्कोडी'तील 7 बंधारे पाण्याखाली!

साेमवारी (ता. २६) महामार्ग खुला झाला तरी वाहतूक सुरु केलेली नाही. नजिकच्या महाराष्ट्रातील कागल, शिराेली येथील महामार्गावर अद्याप काही प्रमाणात पाणी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. संपूर्ण महामार्ग खुला झाल्यास वाहतूक सुरळीत हाेईल, असे प्रशासनाला वाटते. महामार्ग वाहतूकीसाठी सुरु करण्याबद्दल स्थानिक प्रशासन जिल्हाधिकारी व जिल्हा पाेलिस प्रमुखांच्या संपर्कात आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यास मुभा दिलेली नाही. सायंकाळ पर्यंत वाहतूक सुरू हाेईल, असे मंडल पाेलिस निरीक्षक शिवयाेगी संगमेश यांनी सांगितले. सध्या महामार्गावर वाहनांची रांग असल्याने वाहतूक सुरु झाल्यावर ती सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत.

यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद
निपाणी-गडहिंग्लज मार्गावर सुमारे 4 लाखाचा दारुसाठा जप्त; अबकारी पथकाची कारवाई

कार काढण्यासाठी प्रयत्न

महामार्गावर पूरात ट्रक व कार ही वाहने शुक्रवारी अडकली हाेती. त्यापैकी कार पूरात वाहून गेली हाेती. साेमवारी सकाळी पाणी ओसरल्याने कार काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

यमगर्णी महामार्ग खुला, पण वाहतूक बंद
सौंदत्ती यात्रेअभावी हिरावला 2 कोटीचा घास ; निपाणी आगाराला फटका

नजीकच्या महाराष्ट्रातील हद्दीत अद्याप काही ठिकाणी पाणी असल्याचे समजते. वाहतूकीसाठी अद्याप परवाना मिळालेला नाही. सायंकाळपर्यंत वाहतूक सुरू हाेईल.

-शिवयाेगी संगमेश, मंडल पाेलिस निरीक्षक, निपाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()