Traffic police proposal Helmet Inconvenience to drivers, Belgaum news Marathi, Belgaum news updates
Traffic police proposal Helmet Inconvenience to drivers, Belgaum news Marathi, Belgaum news updatessakal

बेळगाव : हेल्मेटसक्ती दोन महिने नको

वाहतूक पोलिसांचा प्रस्ताव; वाहनचालकांची गैरसोय
Published on

बेळगाव : उष्मात प्रचंड वाढ झाली असल्याने हेल्मेट परिधान करून वाहने चालविताना वाहन चालक घामाघूम होत आहेत. त्यामुळे किमान पुढील दोन महिने तरी हेल्मेटसक्ती नको, अशी मागणी केली जात आहे. याचा विचार करून हेल्मेटसक्ती काही दिवसांसाठी शिथिल करण्यात यावी, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मांडला आहे. (Belgaum news updates)

यंदा उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच ढगाळ वातावरण असल्याने उष्मात आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी १२ पासून सायंकाळी ४ पर्यंत नागरिक घराबाहेर बाहेर न पडणे पसंत करीत आहेत. परिणामी, दुपारी रस्त्यावर वाहतूक रोडावली आहे. विकासकामे आणि रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली शहरातील रस्त्याकडेला असलेल्या झाडांची कत्तल केली असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली देखील मिळणे कठीण बनले आहे. त्यातच वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आधीच प्रचंड उष्णता आणि त्यात हेल्मेट परिधान करावे लागत असल्याने वाहन चालकांची घालमेल होत आहे. कोप्पळ आणि रायचूर जिल्ह्याच्या धर्तीवर बेळगावातही पुढील दोन महिने हेल्मेटसक्ती शिथिल करण्यात यावी, अशी मागणी चालकांतून केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनाही नागरिकांच्या मागणीची जाणीव झाली आहे. त्यामुळे काही दिवस हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी शिथिल करावी, असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे मांडला आहे. मात्र, त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे मात्र, पहावे लागणार आहे.

बेळगाव उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे हेल्मेट परिधान करून वाहन चालविताना वाहनचालक घामाघूम होत आहेत. त्यामुळे काही दिवस हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे हेल्मेटसक्ती काही दिवसांसाठी शिथिल करण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

- मंजुनाथ नाईक, निरीक्षक, दक्षिण वाहतूक पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()