कोरोनाकाळ ठरतोय बालविवाहकाळ; सांगली जिल्ह्यात रोखले पंचवीस बालविवाह

बालविवाह
बालविवाह
Updated on
Summary

सांगली जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तीन तालुके बालविवाहाचे प्रकार अधिक आहेत.

सांगली : गेल्या चौदा महिन्यांत कोरोना काळात जिल्ह्यात बालविवाहाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. प्रशासनाने वर्षभरात २५ बालविवाह रोखले आहेत तर तीन बालविवाह प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. राज्यातही कोरोनाकाळात हे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण असून महिला व बाल कल्याण विभागाने राज्यभरात असे ५६० बालविवाह रोखले आहेत. सांगली जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या तीन तालुके बालविवाहाचे प्रकार अधिक आहेत. (twenty five child marriages have been prevented in a year in sangli district)

बालविवाह
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार! ‘सिव्हिल’मधूनच इंजेक्शन गायब

स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेली लोकजागृती, शिक्षणाचा प्रसार यामुळे बालविवाहाचे प्रमाण बरेचसे घटले. तथापि आजही खेडोपाड्यात विशेषतः डोंगरी शिराळा तालुक्यात आणि जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालक्यात होणाऱ्या बालविवाहांचे प्रमाण मोठे आहे. प्रगत पश्‍चिम महाराष्ट्रातही बालविवाहांचे प्रमाण मोठे आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात पुढे आलेल्या तक्रारी ७० हून अधिक आहेत. प्रशासकीय यंत्रणा किंवा कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून विवाह रोखले हे हिमनगाचे टोक आहे; तर गुपचूप झालेल्या विवाहांचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्याकडे आता अधिक काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे.

बालविवाह
सांगलीतील ३३ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीत

१८ वर्षांखालील मुलगी किंवा २१ वर्षांखालील मुलाचा विवाह बालविवाह मानला जातो. असा विवाह करणे किंवा त्याला सहकार्य हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. यात सहभागी आई, वडील, नातलग, वऱ्हाडी, फोटोग्राफर, भटजी, मंडप-डेकोरेटर्स, लग्नपत्रिका मुद्रक अशा सर्वांवर गुन्हा दाखल होतो. त्यांना कारावास व एक लाखांपर्यंतचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. ग्रामस्तरावर ग्रामविकास अधिकारी बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत.

- ॲड. दिलशाद मुजावर, महिला व बाल हक्क चळवळीतील कार्यकर्त्या

बालविवाहासह बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने १०९८ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास तिथून बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा बाल संरक्षक अधिकारी संबंधित पोलिस ठाण्याच्या मदतीने कारवाई करतात. या क्रमांकावर मिळालेली महिती गुप्त ठेवली जाते.

- बापूसाहेब खोत, बाल संरक्षक अधिकारी

अनुभव असं सांगतो की बालविवाह रोखण्यासाठी मुलींना किमान बारावीपर्यंत शिकवण्याचा आग्रह हवा. गावकारभाऱ्यांपेक्षा शिक्षकच प्रभावी काम करू शकतात. जालीहाळ भागातील सुमारे तीसहून अधिक गावात बालविवाहांना चांगला पायबंद बसला आहे. मात्र अजूनही चोरून कर्नाटकात जाऊन असे अनेक विवाह दरवर्षी होतातच. संपूर्ण जत तालुक्यात हे प्रमाण खूप मोठे आहे. यंदा शाळा बंद राहिल्याने वर्षभरात ऊसतोडीसाठी मुलांचेही स्थलांतर झाले. बालविवाहाला पोषक वातावरण तयार झाले. मुलींना शाळेच्या प्रवाहात आणणे. विशेषतः गरीब-वंचित घटकातून येणाऱ्या मुलींच्या पालकशी शिक्षकांनी सतत संवाद ठेवून असे विवाह टाळले पाहिजेत.

- एन. व्ही. देशपांडे, येरळा प्रोजेक्ट सोसायटी

बालविवाह
शेतीच्या आधुनिक परिपूर्ण शेतीसाठी 'कृषीक' ॲपची निर्मिती

बालविवाहाची कारणे

अज्ञान, गरीबी, बेरोजगारी, लैंगिक अत्याचाराची भीती, गावगाड्यात मागास जातीतील मुलींना असलेले भय, यातून बालविवाहाचे प्रकार वाढतात, हे आजवरचे वास्तव आहे. कोरोनामुळे झालेल्या अस्थिर समाजव्यवस्थेमुळेही असे प्रकार घडत आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेला बेरोजगारी, आर्थिक चणचण यातून अनेक पालक मुलीच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी तिचा बालविवाह लावून दिले जात आहेत. येत्या काळात हे प्रमाण वाढणार आहे. गेल्या वर्षभरात कोरोना काळात शाळांना लागलेले टाळे हेही बालविवाहांचे कारण ठरले आहे. साधारण सुट्टीच्या काळात म्हणजे मार्चनंतर परीक्षा आटोपल्या एप्रिल-मे महिन्यात बालविवाहाचे प्रकार घडतात असा अनुभव आहे. कोरोनामुळे शाळाच बंद राहिल्याने विवाह उरकून टाकण्याकडे पालकांचा कल राहील्याचे जतच्या जालीहाळ भागात काम करणाऱ्या येरळा प्रोजेक्ट सोसायटीच्या कार्यकर्त्यांचे निरिक्षण आहे.

(twenty five child marriages have been prevented in a year in sangli district)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()