Murder Case : जमिनीच्या वादातून दोघा सख्ख्या चुलत भावांचा खून; शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत आढळले मृतदेह

कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर अथणी तालुक्यात खोतवाडी हे गाव आहे. येथे खोत कुटुंबीय जास्त असून त्यांची जमीनही अधिक आहे.
Murder Case Athani Police
Murder Case Athani Policeesakal
Updated on
Summary

सोमवारी रात्री खंडोबा व हणमंत हे दोघेजण शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे समजताच संबंधितांच्या नातेवाईकांनी धाव घेतली.

अथणी : दोघा सख्ख्या चुलत भावांचा खून झाल्याची घटना खोतवाडी (ता. अथणी) येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खंडोबा तानाजी खोत (वय २५) व हणमंत रामचंद्र खोत (वय ३७, दोघेही रा. खोतवाडी, ता. अथणी) अशी खून झालेल्या चुलत भावांची नावे आहेत. यामधील हणमंत खोत हे ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat Member) होते.

याबाबत अथणी पोलिस ठाण्यातून (Athani Police Station) व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर अथणी तालुक्यात खोतवाडी हे गाव आहे. येथे खोत कुटुंबीय जास्त असून त्यांची जमीनही अधिक आहे. या गावामध्ये खोत बंधूंची सुमारे ४० एकर जमीन आहे. गेल्या काही वर्षांपासून या जमिनीवरून वाद होत होते, असे समजते. या प्रकरणी गावातील पंचमंडळीही भाग घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते.

Murder Case Athani Police
Sawantwadi : हृदयद्रावक! अंगावर वडाचे झाड कोसळून महाविद्यालयीन विद्यार्थिनी ठार

त्यामुळे हे खून जमिनीच्या वादातून झाले आहेत की, अन्य कारणातून याचा पोलिस शोध घेत आहेत. सोमवारी रात्री खंडोबा व हणमंत हे दोघेजण शाळेजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे समजताच संबंधितांच्या नातेवाईकांनी धाव घेतली. तत्काळ दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी कवठे महांकाळ येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोघांवरही प्रत्येकी पाच ठिकाणी वार होते.

घटनेची माहिती मंगळवारी सकाळी गावात समजली. सोमवारी रात्री हल्ला होऊन दोघेही मृत झाल्याची माहिती सजल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी कवठे महांकाळ येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी केली. तेथे नातेवाईकांकडून अधिक माहिती घेऊन पोलिसांना याबाबत सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पोलिस उपाधीक्षक श्रीपाद जलदे, मंडल पोलिस निरीक्षक रवींद्र नायकवडी, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ उपस्थित होते.

संशयितांना जेरबंद करू : पोलिस अधीक्षक

दोघांनी एकमेकांना धारदार हत्याराने वार करून संपविले असल्याची चर्चा होती. पण, तिथे असे काही दिसून येत नसल्याने कुणी व कशासाठी? हे खून केले आहेत, याचा तपास करून लवकरच संशयित आरोपींना जेरबंद करू, असे पोलिस अधीक्षक गुळेद यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.