Sangli Crime : शेतात नेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; सख्ख्या भावांना 25 वर्षे कारावास

आरोपी निवास ऐवळे याने १६ मे २०२० रोजी पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Updated on

सांगली : पलूस तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी आरोपी दोघा सख्ख्या भावांना २५ वर्षे कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली.

यशवंत मारुती ऐवळे (वय ६५) आणि निवास मारुती ऐवळे (वय ५८ रा. दोघे शिवाजी नगर, कडेगाव, ता. कडेगाव) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील वैशाली मुरचिटे यांनी काम पाहिले.

खटल्याची हकीकत अशी, ही घटना २०२० सालात घडलेली आहे. आरोपी यशवंत ऐवळे याने पीडित विद्यार्थिनीस खाऊ देतो असे सांगून गावातील एका शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच आरोपी निवास ऐवळे याने १६ मे २०२० रोजी पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Sangli Crime
Kolhapur Crime: सोळाव्या वर्षी जबरदस्तीनं पळवून नेलं, 'तिच्या'शी विवाह करून मूल जन्माला घातलं; पतीसह सासू-सासऱ्याविरुध्द गुन्हा

पीडित विद्यार्थिनीने काही दिवसांनी घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना सांगितला. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या दोघा भावांविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात (Kadegaon Police Station) फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Sangli Crime
Ichalkaranji : धक्कादायक! सुपारी देऊन पोटच्या गोळ्याचा बापानं केला खून; डोक्यावर वर्मी घाव, रक्ताचे थेंब अन्..

गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी केला. तपासकामाच्या अनुषंगाने पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीचे, पीडितेचे आणि बाळाचे डीएनए अहवाल पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Sangli Crime
Sangli : लोकसभेपूर्वीच काँग्रेस नेत्यानं टाकला पहिला डाव; भाजप खासदाराला घेरण्याचा प्रयत्न, थेट विचारले 9 प्रश्‍न

सदर खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकारपक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यास आले. त्यामध्ये पीडित विद्यार्थिनी, पीडितेची आई, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी व पुरावे ग्राह्य धरुन न्यायमूर्ती डी. एस. हातरोटे यांनी आरोपी यशवंत ऐवळे आणि निवास ऐवळे यांना प्रत्येकी २५ वर्षे कारावास आणि अनुक्रमे १० हजार आणि ९ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.