नागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस

नागठाणे परिसरात दोन आत्महत्येच्या घटना उघडकीस
Updated on

नागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन रामचंद्र निकम यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला. तपासानंतर तो रमेश विष्णू जाधव (वय 40, मूळ रा. सणबूर, पाटण हल्ली निनाम) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. जाधव हे निनाम येथील मानसिंग जयसिंग महाडिक यांच्या मिठाई दुकानात कामगार म्हणून काम करत होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत श्रीपती किसन जाधव (सणबूर) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सहायक फौजदार भीमराव यादव तपास करत आहेत. 

दरम्यान, दुस-या घटनेत खोडद येथील प्रकाश एकनाथ पवार (वय 50) यांनी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे चुलतभाऊ जितेंद्र भगवान पवार यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. हवालदार एस. बी.पाटील अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.