Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Bombalewadi MIDC Gas Leak : गळतीमुळे बोंबाळेवाडी, रायगाव आणि शाळगाव परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांत जळजळ आणि उलट्यांचा त्रास झाला.
Sangli MIDC
Bombalewadi MIDC Gas Leakesakal
Updated on
Summary

बोंबाळेवाडी-शाळगाव येथे खतनिर्मितीची कंपनी आहे. कंपनीत अचानक वायू गळती (Bombalewadi MIDC Gas Leak) झाली. गळतीमुळे कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला.

कडेगाव : बोंबाळेवाडी-शाळगाव (ता. कडेगाव) येथील एमआयडीसीतील (MIDC) एका कंपनीत आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वायू गळती झाली. त्यामुळे एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्त्यांवर विषारी वायू पसरला. त्यामुळे कंपनीतील चार कामगार आणि शेजारच्या वस्तीतील सहा नागरिक अशा एकूण १० जणांना बाधा झाली. रात्री उशिरा एका महिलेसह (Woman) आणखी एक जणाचा मृत्यू झाल्याचे समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.