UCO Bank : दोघा भावांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर युको बँकेला ठोठावला तब्बल कोट्यवधींचा दंड; काय आहे प्रकरण?

UCO Bank : तासगावच्या दोघा भावांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार येथील ग्राहक न्यायालयाने (Consumer Court) युको बँकेला अभूतपूर्व दंड ठोठावला आहे.
UCO Bank
UCO Bankesakal
Updated on
Summary

तक्रारदार अनिकेतवर सुनावणीदरम्यान हृ‍दय शस्त्रक्रिया करावी लागल्याने त्याच्यावतीने थोरला भाऊ आदर्शने आयोगासमोर बाजू मांडली.

सांगली : तासगावच्या दोघा भावांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार येथील ग्राहक न्यायालयाने (Consumer Court) युको बँकेला अभूतपूर्व दंड ठोठावला आहे. ‘सर्व शाखांत कर्जपुरवठ्याविषयी सूचना फलकांत दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करणे, कर्जास पात्र व ‘कार्यरत भांडवल मर्यादा’ असणाऱ्या ग्राहकांच्या खात्यातून त्यांना माहिती व परवानगी न घेता परस्पर शुल्क केल्याबद्दल आणि ग्राहकांची निवड, माहिती, शिक्षण खात्री आदी अधिकारांचे हनन करणे आदी आरोप मान्य करून तक्रारदारांसह देशभरातील सर्व पात्र ग्राहकांना सरसकट पाच व अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करावेत,’ असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.