Miraj Shivsena Melava : गद्दारांनी केलेला विश्वासघात जनतेला ठाऊक आहे; वरुण सरदेसाईंचा शिंदे गटावर घणाघात

देशात, राज्यात बेरोजगारी वाढत आहे. सत्ताधारी पक्ष फोडण्याच्या मागे लागलेत.
Miraj Shivsena Melava
Miraj Shivsena Melavaesakal
Updated on
Summary

दहा वर्षांत मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळेच राम मंदिराच्या नावावर मते मागितली जात आहेत.

मिरज : ‘‘केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांना न्यायालयाने फटकारले. त्यावरून लोकशाही धोक्यात असल्याचे सिद्ध होते. निवडणुका होतील, तेव्हा जाती-धर्म, भेदभाव विसरून देशात लोकशाही टिकवायची आहे, ती प्रत्येक व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राहील,’’ असा विश्‍वास शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी व्यक्त केला. ते मिरजेत आयोजित शिवसेना संवाद मेळाव्यात बोलत होते.

संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे-पाटील (Nitin Bangude-Patil), पश्चिम महाराष्ट्र युवा सेना सचिव अविनाश बलकवडे, युवा सेना विस्तारक उमेश खताते, जिल्हाध्यक्ष संजय विभूते, अभिजित पाटील, प्रा. सिद्धार्थ जाधव, चंद्रकांत मेंगुरे, संजय काटे प्रमुख उपस्थित होते.

Miraj Shivsena Melava
Konkan Politics : खेडमध्ये घोषणाबाजी करत रामदास कदमांबाबत वापरले अपशब्द; ठाकरे-शिंदे गटांत तणाव

सरदेसाई म्हणाले, ‘‘केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून राज्यातील प्रमुख प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालण्याचे पाहिलेले स्वप्न उद्धव ठाकरे यांनी परतवून लावल्याने शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले. तरीही पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचे जनमत कायम आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडून राज्यात युतीकडे बहुमत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका घ्यायचे धाडस राज्यकर्ते करत नाहीत. कारण त्यांना माहीत आहे, की जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोविड आपत्तीकाळात केलेल्या कामाची दखल देशपातळीवर घेतली आहे. ते जनतेच्या मनामनांत आहेत. गद्दारांनी केलेला विश्वासघात जनतेला ठाऊक आहे. मिरज मतदारसंघाबाबत पक्षप्रमुख सकारात्मक निर्णय घेतीलच. मात्र मिरजेत मुंबईच्या धर्तीवर बूथनिहाय संघटनात्मक बांधणी करा. मुंबईत शिवसेना शाखेच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली जातात. हाच आदर्श मिरज मतदार संघात राबवा.

Miraj Shivsena Melava
'लक्षतीर्थ'मधील मदरशाचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या 600 जणांवर गुन्हा दाखल

संपर्कप्रमुख प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, ‘‘देशात, राज्यात बेरोजगारी वाढत आहे. सत्ताधारी पक्ष फोडण्याच्या मागे लागलेत. मात्र शिवसेना संपत नसून संपवते, हा इतिहास आहे. ५० टक्के तरुणाईचा भारत देश सध्या बेरोजगारीच्या उंबरठ्यावर आहे. देशात साडेसतरा लाख लोकांनी देश सोडला. कारण देशात नोकरी नाही. बेरोजगारीची समस्या कायम आहे, हे मुख्य कारण आहे.’’ बजरंग पाटील, तानाजी सातपुते, ओंकार जोशी, केदार गुरव, महादेव हुलवान, पप्पू शिंदे, अतुल रसाळ यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सरदेसाईंचा राणेंना टोला

राज्याला गेली अडीच वर्षे केंद्राकडून सूक्ष्म-लघुउद्योग मंत्रिपद मिळाले. त्यांनी कोणता नवा रोजगार राज्यात आणला का? कोणते उद्योग राज्यात सुरू केले? केंद्रीय योजना दिल्या का, असा सवाल सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना केला.

Miraj Shivsena Melava
Loksabha Election : महाविकास आघाडी 48 जागा लढविणार, 'या' जागा ठरणार निर्णायक; काय म्हणाले आमदार जगताप?

‘राम की होई गई अब काम बात होनी चाहिए’

दहा वर्षांत मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळेच राम मंदिराच्या नावावर मते मागितली जात आहेत. दहा वर्षांत कामे केली असती तर ही वेळ आली नसती. महाविकास आघाडीचे सरकार पाडावे लागले नसते, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.