"उजनी'प्रमाणेच "फिरकी जार'चेही पाणी घातकच 

ujani dam
ujani dam
Updated on

सोलापूर : उजनीतील प्रदूषित पाण्यापासून बचाव करण्यासाठी अनेकांना अनेक मार्ग अवलंबले आहेत. जारचे पाणी पिण्यास काहीजण प्राधान्य देतात. तुम्ही जर फिरकी जारमधील पाणी पीत असाल तर सावध व्हा! उजनीच्या प्रदूषित पाण्याप्रमाणेच फिरकी जारचेही पाणी आरोग्यास घातक असल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्यांनी जर फिरकी जारमधील पाणी पिण्याचा पर्याय निवडला असेल तर त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागणार आहे. 
हेही वाचा - खळबळजनक, पाथरीकर म्हणतात बाबा आमचेच...शिर्डीकरांकडे पुरावाच नाही 
सोलापूर शहर व जिल्ह्यातील फिरकी जारच्या पाण्याचे उत्पादन करणारे जवळपास 250 उत्पादक आहेत. या उत्पादकांना कोणत्याही शासकीय परवानगीची, नियमांच्या पालनांची गरज भासत नाही. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यासह इतर कायद्यातील पळवाटा शोधून फिरकी जारचा धंदा सध्या जोरात आहे. लग्न समारंभ असो की फास्टफूड विक्रेते सर्रास फिरकी जारच्या पाण्याचा वापर करतात. जारमधील पाणी म्हणजे शुद्ध पाणी अशीच समजूत करून घेऊन अनेकजण बिनधास्त हे पाणी पितात. हे पाणी तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे फिरकी जारमधील पाणी हे शुद्धच असते यावर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन अन्न प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 
हेही वाचा - मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक 
सोलापूर शहर व परिसरातील "पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर' करणारे जवळपास 39 उत्पादक आहेत. हे उत्पादक अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत येत असल्याने येथील पाण्याच्या शुध्दतेबाबत आणि स्वच्छतेबाबत अन्न प्रशासन विभाग दक्ष असतो. ग्राहकांना पिण्यासाठी "पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर'चा वापर करावा व आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.