Sangli News: आश्रम शाळेतील शंभरावर मुलांना विषबाधा, जत तालुक्यातील उमदी येथील घटना

उमदी (ता. जत) येथील समता आश्रम शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे.
Basundi
Basundisakal
Updated on

माडग्याळ - उमदी (ता. जत) येथील समता आश्रम शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या मुलांची संख्या १०० च्या वर आहे. विषबाधा झालेल्या मुलांवर माडग्याळ ग्रामीण रुग्णालय व जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, यातील काही मुलांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, उमदी येथे रविवारी एका मंगल कार्यालयात कार्यक्रम होता. तेथील शिल्लक राहिलेले जेवण आश्रमशाळेतील मुलांना दिले. दरम्यान, काही वेळानंतर मुलांना त्रास होऊ लागला. त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अजूनही काही मुले ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. मुले जेवल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्याने तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.