उपळाई बुद्रुक (ता. माढा, जि. सोलापूर) : सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावात काम मिळत नसल्याने कामाच्या शोधात मुंबईत गेलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी आज स्वतःची अमेरिकेत कंपनी स्थापन केली आहे. उपळाई बुद्रूक येथील कृष्णा शिंदे यांच्या मुलांची ही प्रेरणादायी कहाणी असून त्यांनी परिस्थितीची जाण ठेवत उच्च शिक्षण घेत मराठी झेंडा अटकेपार रोवला आहे.
हेही वाचा : माजी आमदाराकडून संचालकाला जीवे मारण्याची धमकी
उपळाई बुद्रूक हा कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा म्हणून येथील लोक कामाच्या शोधात मुंबई, पुणे येथे जात असत. तसेच कृष्णा अर्जुन शिंदे हे 1957 मध्ये गावात काम मिळत नसल्याने कामाच्या शोधार्थ मुंबईसारख्या अनोळखी शहरात कुटुंबासह वास्तव्यास गेले होते. नशिबाने त्यांना पोलिस खात्यात नोकरी मिळाली. एवढ्या मोठ्या शहरात त्यांना 10 बाय 10ची खोली राहायला मिळाली. त्या खोलीत ते आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत कसेबसे रहात होते. त्यांना महेश, प्रमोद, राजेंद्र अशी तीन मुले. वडिलांची कष्ट करण्याची जिद्द बघून मुलेही जिद्द व चिकाटीने अभ्यास करत. एकीकडे त्या वेळी पोलिसांची मुले म्हणजे कुठेही भरकटत जाणारी असे समजले जायचं. पण या तिघांनाही परिस्थितीची जाण असल्याने हलाखीच्या परिस्थिती त्या छोट्या खोलीत अभ्यास करत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मुलांची शिकण्याची जिद्द बघून वडिलांनीही संसारचा गाडा हाकत असताना मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता ठेवली नाही. तिघांनाही चांगल्या दर्जाचे व उत्तम शिक्षण दिले. वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज मुलांनी सार्थकी लावले. तिघांनीही अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.
भारतातील संगणक विभागाच्या मुंबईतील आयआयटीच्या पहिल्या बॅचमधून त्यांचा थोरला मुलगा महेश हे अभियंता म्हणून उत्तीर्ण झाले. एकेकाळी वडील कामाच्या शोधात मुंबईत आले होते. तर आज त्यांच्या मुलाची अमेरिकेत शिकागो येथे स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी आहे. तर दुसरा मुलगा प्रमोद शिंदे हे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेऊन आज ते म्हाडाच्या कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तर धाकटा मुलगा राजेंद्र शिंदे हे देखील संगणक शाखेत पदवी घेऊन आज ते इंग्लड येथे स्थायिक झाले आहेत. रहायला घर नसल्याने मुलांनी वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेत सातासमुद्रापार आपल वलंय निर्माण केलं. जे स्वप्न बघितले, जे हवे होते ते मिळाले. पण या काळात ज्या मातृभूमीत आपला जन्म झाला त्या कर्मभूमीला ते विसरले नाहीत. त्यामुळे गावच्या अडचणींच्या काळात सतत त्यांनी गावासाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. ज्यांची बाग फुलून आली. त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले. त्यांनी दोन गाणी द्यावीत. प्रसिद्ध कवी हलसगीकर यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे शिंदे बंधूंनी गावच्या विकासासाठी सातत्याने फुल नाय फुलांची पाकळी तरी मदत दरवर्षी करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.