कंबरडं मोडलं... कुटुंबही फरफटलं...

 Vadap in business crisis due to lack of discount in lockdown
Vadap in business crisis due to lack of discount in lockdown
Updated on

तारळे (जि. सातारा) : कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रोगावर खबरदारी म्हणून जगासह भारतात लॉकडाउनचा पर्याय निवडण्यात आला. एक, दोन, तीन व चार टप्प्यांत हे लॉकडाउन वाढविण्यात आले. या लॉकडाउनच्या फेऱ्यांत अनेक व्यवसाय अडकले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. समाजातील अनेक घटकांना याच्या झळा पोचल्या. यातून वडाप व्यवसायदेखील सुटलेला नाही. 

पहिल्या दोन टप्प्यांत बहुतांशी व्यवसाय बंद होते. मात्र, तिसऱ्या टप्प्यापासून काही प्रमाणात शिथिलता मिळाली. अनेक छोटे- मोठे व्यवसाय सुरू झाले. शेवटच्या टप्प्यात बस वाहतूक व सलून दुकाने देखील नियम, अटी घालून सुरू करण्यात आली. हे अडचणीतले व कोरोना संसर्ग होण्याची जास्त शक्‍यता असणारे व्यवसाय सुरू झाले. मात्र, वडाप व्यवसाय प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील हजारो वाहने दोन महिन्यांपासून जागेवरून हलली नाहीत. अनेकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या असून, कर्जाचा डोंगर वाढत आहे, तर रोजचा खर्च कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय खेडोपाडी दळणवळणदेखील ठप्प झालेले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बाजारपेठांच्या गावी जाण्यासाठी लोकांना चालत जावे लागत आहे. बस वाहतूक सुरू झाली. मात्र, ती मुख्य शहरांमध्ये सुरू झाली. अडवळणाच्या मार्गावर वडाप उत्तम पर्याय आहे. त्यांनाही अटी, शर्तींवर वाहने चालविण्यास परवानगी मिळावी, होत असलेल्या आर्थिक कोंडीतून बाहेर काढावे, अशी मागणी वडापचालक-मालक वर्गातून होत आहे. 

दोन महिन्यांपासून गाड्या जागेवरच आहेत. कर्ज वाढत चालले आहे. तर रोजचा खर्च भागविताना मेटाकुटीला येत आहे. अभूतपूर्व आर्थिक कोंडी झाली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढावा. 

-बंडा पाटील, 
अध्यक्ष, तारळे विभाग वडाप संघटना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.