दिग्गजांची फिल्डिंग "याच्या'साठी 

Veteran's efforts for an approved councilor position
Veteran's efforts for an approved councilor position
Updated on

नगर : महापालिका निवडणूक होऊन 13 महिन्यांचा कालावधी लोटला, तरी स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झाली नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्याने त्या निवडीला मुहूर्त आता मिळाला आहे. स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शुक्रवारी (ता. 10) महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदाच्या हालचालींना वेग येणार आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीच्या आधी नगर महापालिका निवडणूक झाली. त्या निवडणुकीत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असला, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप यांनी मिळून महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या पाच जागांपैकी दोन जागा शिवसेनेला, दोन राष्ट्रवादी कॉंग्रेसला, तर एक जागा भाजपच्या वाट्याला येते. गेल्या 13 महिन्यांत लोकसभा व विधानसभेची निवडणूक होईपर्यंत या तीनही पक्षांनी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडप्रक्रियेच्या हालचाली केल्या नाहीत. 

महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या दिग्गजांपैकी काही जणांना शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्षनेते करण्याचा शब्द दिला. त्यानुसार या पराभूत दिग्गजांनी विधानसभा निवडणुकीत मन लावून काम केले. यात काही नेत्यांना विजय, तर काहींना पराभव पहावा लागला. आता या नेतेमंडळींनी शब्दाला जागून स्वीकृत नगरसेवक ठरविण्याच्या हालचाली सुरू कराव्यात, यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. या स्वीकृत नगरसेवकांत एक जण कला, क्रीडा, संस्कृती व साहित्य क्षेत्रातील अपेक्षित असतो. 

नेतेमंडळींनी स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्षनेतेपदाचा शब्द निवडणुकीच्या धामधुमीत उपलब्ध जागांपेक्षा जास्त जणांना दिला. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवक ठरविण्यात नेतेमंडळींचीच अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे ज्यांना स्वीकृत नगरसेवक व विरोधी पक्षनेतेपदाचा शब्द नेत्यांनी दिला, तो पाळला जाईलच याची शक्‍यता धूसर आहे. यातच शिवसेनेतील गटबाजीही उघडपणे समोर आली आहे. 

"स्वीकृत'साठी यांची नावे चर्चेत..! 
शिवसेना - भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, दिलीप सातपुते, जयंत येलूलकर, हर्षवर्धन कोतकर, आकाश कातोरे. 
भाजप - सुवेंद्र गांधी, महेश तवले, अभय आगरकर, राहुल रासकर, किशोर बोरा, किशोर डागवाले. 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - माणिक विधाते, विपुल शेटिया, संजय घुले, बाबासाहेब गाडळकर, अरविंद शिंदे, सुरेश बनसोडे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.