तारीख, वेळ निश्चित करा! जनतेसमोर हिशोब देणार: पाटलांचा इशारा

Vikaram Patil, Jayant Patil
Vikaram Patil, Jayant PatilEsakal
Updated on

इस्लामपूर (सांगली) : हिंमत असेल तर पालकमंत्र्यांच्याशिवाय निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा, असे आव्हान विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम (Vikaram Patil) पाटील यांनी राष्ट्रवादीला आज पत्रकार परिषदेत दिले. शिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारत असून त्यांनी तारीख, वार, वेळ निश्चित करावी. गांधी चौकात स्टेजवर यावे. आम्ही आणलेल्या निधीचा हिशोब जनतेसमोर देऊ, असेही ते म्हणाले. शिवसेनेचे आनंदराव पवार, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, शिंगण उपस्थित होते.

विक्रम पाटील म्हणाले, " राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शहराच्या विकासाशी देणेघेणे नाही. त्यांनी सत्ताकाळात फक्त स्वतःची मालमत्ता, व्यवसाय, उद्योगधंदे वाढवले. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा विसर संजय कोरे यांना पडला होता. ते नेहमी नगराध्यक्षांच्या सानिध्यात राहून नगराध्यक्षानी चांगले काम केले आहे असे सांगत. संजय कोरे, शहाजी पाटील,दादासो पाटील व खंडेराव जाधव यांनी व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेले आवाहन आम्ही स्वीकारतो. राष्ट्रवादीच्या गेल्या ३० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा निधी ५ वर्षांच्या काळामध्ये आलेला आहे. संजय कोरे स्वतःच्या प्रभागाचा विकास करू शकले नाहीत. त्यांना शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.

Vikaram Patil, Jayant Patil
तासाला 1200 भाविकांनाच प्रवेश; कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनात बदल

पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळण्यासाठी आम्ही तातडीने सभा घेतली पण व्हिडीओ शुटींगचा आग्रह करून यांनीच तो विषय प्रलंबित ठेवला. आमच्या ५ वर्षात १२३ कोटी ३७ लाख ३३ हजार ५८७ रूपये निधी आम्ही आणला. त्यांच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत १७९ कोटी ५३ लाख ९७ हजार रूपये एवढा निधी आणला. अनेक ठराव बेकायदेशीर झाल्याचा आरोप खंडेराव जाधव यांनी केला. हे ठराव होताना राष्ट्रवादी सभागृहामध्ये काय करीत होती? त्यांनी विरोध का केला नाही? उलट शिवसेनेने आणलेल्या ११ कोटी निधीला विरोध करत ३ वेळा सभेला गैरहजर राहून विकासकामाला खिळ घातली. मुख्याधिकाऱ्यांना हाताशी धरून चालू भुयारी गटरचे काम थांबवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()